नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील अनेक संस्था, संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळा, महाविद्यालये, आरोग्य केंद्रांत विविध उपक्रम राबविण्यात आले. यानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. ग्रामीण भागातील धावण्याच्या स्पर्धेचे कौतुक करावे तितके थोडेच आहे, अशा स्पर्धा सातत्याने व्हाव्यात. ग्रामीण भागातील मुलीं, महिलांनी अशा स्पर्धांमध्ये सातत्याने सहभागी होऊन आपले नाव देशाच्या कानाकोपºयात पोहोचवावे, असे प्रतिपादन आॅलिम्पिक धावपटू कविता राऊत यांनी येवल्यात केले. जागतिक महिला दिनानिमित्त येवला तालुका क्रीडा संकुल समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या शंभर मीटर धावणे, दोर उड्या मारणे, रस्सीखेच, जलद चालणे आदी क्र ीडा स्पर्धांसह रांगोळी स्पर्धेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. प्रत्येक स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्या महिलांचा कापसे पैठणीच्या सहकार्यातून अनुक्रमे पैठणी, सेमी पैठणी व पैठणी देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मुली, महिलांना तालुका केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने सॅनेटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात २५० महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात नाशिक येथील दीपाली शिंदे यांनी सादर केलेले योगावरील ‘झुंबा’ नृत्याने महिलांनाही ठेका धरण्यास भाग पाडले. सरोजिनी वखारे, पद्मा शिंदे, पुष्पा गायकवाड, नगरसेवक गणेश शिंदे, डॉ. कविता दराडे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष सोनल पटणी, कापसे समूहाच्या मीरा कापसे, सुनीता खोकले, वंदना कापसे, ब्रह्मकुमारी परिवाराच्या नीतादीदी, प्राजक्ता पवार, नेहरू युवा केंद्राचे अजहर शहा, प्रशांत शीनकर आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी प्रास्तविक केले. ज्योती कोकणे यांनी सूत्रसंचालन केले. मान्यवरांनी महिलांना शुभेच्छा दिल्या.
महिला दिन : संस्था, संघटनांतर्फे विविध कार्यक्रम जिल्ह्यात नारीशक्तीचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:11 AM
नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील अनेक संस्था, संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळा, महाविद्यालये, आरोग्य केंद्रांत विविध उपक्रम राबविण्यात आले.
ठळक मुद्देविविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरवरांगोळी स्पर्धेला महिलांचा मोठा प्रतिसाद