अग्र समाजाचे कार्य प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:10 AM2018-11-19T00:10:30+5:302018-11-19T00:49:28+5:30

महिलांचे आर्थिक सामाजिक सबलीकरण व सक्षमीकरण करणे हे सरकारचे मिशन कार्यक्रमांपैकी जरी एक असले तरी उत्तर महाराष्टÑातील नव्हे तर देशभरातील अग्रवाल समाजाचे महिला सक्षमीकरणासाठी मिळणारे योगदान हे नक्कीच प्रेरणादायी आहे. हा समाज शिक्षण, राजकारण, समाजकारण, महिलांचा सर्वांगिण विकास अशा सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहून चोख भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.

The work of leading society is inspirational | अग्र समाजाचे कार्य प्रेरणादायी

अग्र प्रेरणा १५व्या राज्यस्तरीय महिला अधिवेशनाच्या दीपप्रज्वलनाप्रसंगी उपस्थित संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, महापौर रंजना भानसी, आमदार सीमा हिरे. समवेत डॉ. प्रशांत पाटील, किरण अग्रवाल, डॉ. ममता अग्रवाल, विजयकुमार चौधरी, वीना गर्ग, मालती गुप्ता, उषा अग्रवाल, मीना अग्रवाल, सपना अग्रवाल, गोपाल अग्रवाल, नेमिचंद पोद्दार आदी.

Next
ठळक मुद्देसुभाष भामरे : ‘अग्र-प्रेरणा’ राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन

नाशिक : महिलांचे आर्थिक सामाजिक सबलीकरण व सक्षमीकरण करणे हे सरकारचे मिशन कार्यक्रमांपैकी जरी एक असले तरी उत्तर महाराष्टÑातील नव्हे तर देशभरातील अग्रवाल समाजाचे महिला सक्षमीकरणासाठी मिळणारे योगदान हे नक्कीच प्रेरणादायी आहे. हा समाज शिक्षण, राजकारण, समाजकारण, महिलांचा सर्वांगिण विकास अशा सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहून चोख भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.
अग्रवाल प्रांतीय महिला संमेलनाच्या १५वे राज्यस्तरीय ‘अग्र-प्रेरणा’ महिला अधिवेशन रविवारी (दि.१८) शहरातील स्वामी नारायण बॅक्वेट हॉलमध्ये उत्साहात पार पडले. या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी भामरे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपिठावर महापौर रंजना भानसी, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, राज्य अग्रवाल संमेलनाचे अध्यक्ष विजयकुमार चौधरी, महामंत्री गोपाल अग्रवाल, महिला प्रांतीय अध्यक्ष मालती गुप्ता, महामंत्री उषा अग्रवाल, चेअरपर्सन मीना अग्रवाल, विभागीय अध्यक्ष अलका अग्रवाल, अग्र सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष किरण अग्रवाल, युवा अध्यक्ष मुकेश गोयंका, अंकित अग्रवाल, अग्रवाल सभेचे अध्यक्ष नेमिचंद पोद्दार आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भामरे म्हणाले, अग्रवाल समाज हा महाराजा श्री अग्रसेन महाराज यांच्या तत्त्वांवर चालणारा समाज आहे. त्यांनी दिलेला मुलमंत्र आर्थिक समानता, आपापसांत सहकार्य अन् संघटनाचे महत्त्व समाजाने गांभीर्याने ओळखले आहे. त्यामुळे हा समाज आज राजकारणात ‘किंगमेकर’ची भूमिका बजावताना दिसतो.
महिलांचे संघटन आणि सर्वांगिण विकास कौतुकास्पद असल्याचे भानसी यांनी यावेळी मनोगतातून सांगितले. तसेच हिरे यांनीही अधिवेशनात मांडण्यात आलेल्या ठराव हे ज्वलंत विषयांना अनुसरून असल्याचे सांगितले. समाजसेवा, धर्मकारणासोबत राजकारणामध्ये महिलांनी येण्याची गरज विजयकुमार चौधरी यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक महामंत्री उषा अग्रवाल यांनी केले. स्वागत नाशिकच्या वीण गर्ग, कार्याध्यक्ष सपना अग्रवाल आदींनी केले.
दरम्यान, अग्रज्योती, अग्रप्रभा पुरस्काराने समाजातील महिलांना सन्मानित करण्यात आले. तसेच अग्र प्रेरणा-२०१८’ या माहितीपुस्तिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.
असे झाले ठराव
‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ या उक्तीनुसार अवयवदानाचा संकल्प, पर्यावरण संरक्षण हे कर्तव्य. प्री-वेडिंग फोटो शूटवर बंदी गरजेची, स्त्री-पुरुषांमध्ये समन्वय गरजेचा, मुलीच्या वैवाहिक आयुष्यात आईची भूमिका हे ठराव सर्वांनुमते पारित करण्यात आले.
या महिलांचा झाला सन्मान
अग्रज्योती पुरस्कारार्थी : अलका अग्रवाल (शैक्षणिक), वीणा गर्ग (औद्योगिक), निर्मला अग्रवाल (सांस्कृतिक), अनिता अग्रवाल (सामाजिक), ममता गिंदोडिया (अध्यात्म)
अग्रप्रभा पुरस्कारार्थी : कल्पना चौधरी (महिला संघटन), मंजू तुलस्यान (सामाजिक), शीला अग्रवाल (महिला उत्थान), शोभा पालडीवाल (धार्मिक)
विशेष पुरस्कार : सपना अग्रवाल, अरुणा अग्रवाल, डॉ. ममता अग्रवाल.
मुलींसाठी सैनिकी शाळांचे दरवाजे खुले
भाजपा सरकारने सत्तेत आल्यानंतर मुलींसाठी सैनिकी शाळांचे दरवाजे खुले करण्यास प्राधान्य दिले. महिला सर्वच क्षेत्रांत अग्रेसर असताना त्यांच्यामधील देशभावना लक्षात घेता देशाच्या संरक्षण क्षेत्रातही त्या मागे राहता कामा नये, या उद्देशाने भारतीय भूदल, नौदल, वायुदलात प्रवेश करण्यासाठी सैनिकी शाळांचे दरवाजे तरुणींकरिता खुले असल्याचे डॉ. सुभाष भामरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Web Title: The work of leading society is inspirational

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.