नाशिकरोड : भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयातील वर्क्स कमिटीच्या द्विवार्षिक निवडणुकीत कामगार पॅनलने बहुमत प्राप्त करत सत्ता हस्तगत केली आहे. आपला पॅनलला दोन्हीही मुद्रणालयांतून फक्त सात जागांवर विजय मिळाला आहे. भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयात पहिल्यांदाच मजदूर संघ व वर्क्स कमिटीची निवडणूक एकाच वेळी घेण्यात आली. तसेच वर्क्स कमिटीच्या निवडणुकीत भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयात पहिल्यांदाच स्वतंत्र मतदान घेण्यात आले. निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले होते. दोन्ही मुद्रणालयांत सोमवारी आपापल्या विभागात वर्क्स कमिटी मतदानाची मतमोजणी करण्यात आली.आयएसपी विजयी उमेदवारआयएसपी प्रेसमध्ये कामगार प्रतिनिधी ११ व स्टाफ ३ अशा १४ जागांसाठी मतदान झाले होते. त्यामध्ये कामगार प्रतिनिधीतून कामगार पॅनलचे बळवंत आरोटे (८४६), दत्तू गवळी (८२८), सचिन तेजाळे (८९५), भीमा नवाळे (८४१), अशोक पेखळे (८३८), मच्छिंद्र मगर (८१२), भाऊसाहेब सूर्यवंशी (८१४), बबन सैदपाटील (८०६), डॉ. चंद्रकांत हिंगमिरे (८९३), आपला पॅनलचे दगू खोले (७८५), बाळासाहेब चंद्रमोरे (८०४) हे विजयी झाले, तर स्टाफमधून आपला पॅनल - गयाप्रसाद शर्मा (१२२), कामगार पॅनलचे राहुल रामराजे (१७४), तुषार सावसाकडे (१४३) मते मिळवून विजयी झाले.सीएनपी विजयी उमेदवारसीएनपी प्रेसमध्ये वर्क्स कमिटी कामगार प्रतिनिधी १३ व स्टाफ २ अशा एकूण १५ जागांसाठी मतदान झाले होते. त्यामध्ये कामगार पॅनलचे नंदू कदम (१०१२), संतोष कटाळे (९५७), योगेश कुलवदे (९४५), अरुण चव्हाणके (९०९), साहेबराव गाडेकर (८९१), दिनेश कदम (८८४), तुळशीदास पाटोळे (८७८), बाळासाहेब ढेरिंगे (८२७), संजय गरकळ (७८७), सुभाष ढोकणे (७८४), आपला पॅनलचे राजेंद्र शहाणे (८६६), हरिभाऊ ढिकले (८२७), अनिल जाधव (७७७) मते मिळवून विजयी झाले, तर स्टाफमधून आपला पॅनलचे रवींद्र गोजरे (१४१) व कामगार पॅनलचे विनोद ढेरिंगे (११७) मते मिळवून विजयी झाले.विजयाचा जल्लोषमजदूर संघापाठोपाठ वर्क्स कमिटीच्या निवडणुकीत दोन्ही मुद्रणालयांत कामगार पॅनलने बाजी मारल्याने सोमवारी सायंकाळी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाके फोडून जोरदार विजयाचा जल्लोष साजरा केला.आपला पॅनलने सत्ता गमावलीगेल्या निवडणुकीत कामगार पॅनलने आयएसपीमध्ये व सीएनपीमध्ये आपला पॅनलने सत्ता मिळविली होती. मात्र यंदा दोन्ही मुद्रणालयांत कामगार पॅनलने वर्क्स कमिटीची सत्ता खेचून आणली आहे.
वर्क्स कमिटीत ‘कामगार’ला बहुमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:11 AM