सिन्नर महाविद्यालयात कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:14 AM2021-03-31T04:14:24+5:302021-03-31T04:14:24+5:30
पूर्व भागात विहिरींनी गाठला तळ वावी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पंचाळेसह परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने रब्बी हंगामातील ...
पूर्व भागात विहिरींनी गाठला तळ
वावी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पंचाळेसह परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांना टंचाईची झळ बसू लागली आहे. गेल्या आठ दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाण्याची पातळी खालावली आहे.
पांढुर्लीत जनता कर्फ्यू
सिन्नर : कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील पांढुर्लीत आठ दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. गावातील व्यावसायिक व दुकानदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे.
वंडागळीत कोरोना जनजागृती फेरी
वडांगळी : येथे ग्रामपंचायत व आरोग्य उपकेंद्र यांच्या वतीने गावातून कोरोना जनजागृती फेरी काढण्यात आली. सरपंच योगेश घोटेकर यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली व घराची काळजी घेण्याचे आवाहन केले.
दोन हजार लीटर सॅनिटायझर वाटप
सिन्नर : सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. यापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वेळोवेळी हात धुण्यासाठी सॅनिटायझरचा वापर केला जातो. सामाजिक दायित्व म्हणून माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे सचिव राजेश गडाख यांनी परिसरात सुमारे दोन हजार लीटर सॅनिटायझरचे वाटप केले.
शिवाजीनगरला कोरोना लसीकरण केंद्र
सिन्नर : शहरालगत असणाऱ्या सरदवाडी उपनगरांमधील नागरिकांसाठी शिवाजीनगर येथील नगर परिषदेच्या दवाखाना इमारतीत कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी पाठपुरावा केला होता.