सूर्यनमस्कारात जागतिक विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:59 AM2019-09-03T00:59:50+5:302019-09-03T01:01:04+5:30
योगामुळे शारीरिक मानसिक व आध्यात्मिक बलस्थाने भक्कम होतात. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार करत केलेला जागतिक विक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले.
नाशिकरोड : योगामुळे शारीरिक मानसिक व आध्यात्मिक बलस्थाने भक्कम होतात. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार करत केलेला जागतिक विक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले.
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने सूर्यनमस्कार एक आविष्कार या उपक्रमात लिम्का बुक आॅफ रेकॉर्डचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. जागतिक विक्रम प्रमाणपत्र वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. वि. रा. काकतकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष श्रीपाद देशपांडे, सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी, खजिनदार वैशाली गोसावी, अलका कुलकर्णी, प्रद्युम्न जोशी, डॉ. मनोज कनोजिया आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, डॉ. वि. रा. काकतकर आदींची भाषणे झाली. यावेळी अलका कुलकर्णी यांनी सूर्यनमस्कार उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी केले.
पाहुण्यांचे स्वागत स्वप्ना मालपाठक व आभार प्रधुम्न जोशी यांनी मानले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, विविध शाळांचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.