जागतिक स्पर्धेत खरोटे यांनी फडकविला तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:42 AM2017-12-15T00:42:17+5:302017-12-15T00:42:26+5:30

‘विकीपिडीया’च्या राष्टÑीय-आंतरराष्टÑीय स्पर्धेत ‘लोकमत’चे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांनी टिपलेल्या जेजुरीमधील चंपाषष्ठीच्या ‘खंडोबा उत्सव’ छायाचित्राने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय फेरीमध्ये जगभरातून सुमारे दोन लाख ४६ हजार १०१ छायाचित्रे प्राप्त झाली होती. या सर्व छायाचित्रांमध्ये भारताच्या टॉप टेनमधील अव्वलस्थानी राहिलेले खरोटे यांनी टिपलेल्या छायाचित्राला प्रथम क्रमांक मिळाला

 World trophy kharte has hoisted the tricolor | जागतिक स्पर्धेत खरोटे यांनी फडकविला तिरंगा

जागतिक स्पर्धेत खरोटे यांनी फडकविला तिरंगा

Next

नाशिक : ‘विकीपिडीया’च्या राष्टÑीय-आंतरराष्टÑीय स्पर्धेत ‘लोकमत’चे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांनी टिपलेल्या जेजुरीमधील चंपाषष्ठीच्या ‘खंडोबा उत्सव’ छायाचित्राने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय फेरीमध्ये जगभरातून सुमारे दोन लाख ४६ हजार १०१ छायाचित्रे प्राप्त झाली होती. या सर्व छायाचित्रांमध्ये भारताच्या टॉप टेनमधील अव्वलस्थानी राहिलेले खरोटे यांनी टिपलेल्या छायाचित्राला प्रथम क्रमांक मिळाला असून, आंतरराष्टÑीय ‘विकीलव्ह मॉन्यूमेंट्स स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकला.  गेल्या सप्टेंबर महिन्यात विकीपिडीयाच्या वतीने ‘वास्तू’ संकल्पना निश्चित करून ‘विकीलव्ह मॉन्यूमेंट्स’ स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत भारतातून ७ हजार ७९३ छायाचित्रे प्राप्त झाली होती. यामधून छाननीअंतर्गत ५० छायाचित्रे विकीपिडीयाच्या परीक्षकांच्या समूहाने निवडली व या निवडलेल्या छायाचित्रांमधून ‘टॉप टेन’ यादीमध्ये खरोटे यांच्या छायाचित्राने प्रथम क्रमांक राखला. भारतातून ही टॉप-१० छायाचित्रे आंतरराष्ट्रीय फेरीसाठी पात्र ठरली. या फेरीमध्ये जगभरातील ४५पेक्षा अधिक देशांमधून सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक छायाचित्रे स्पर्धेत होती. या फेरीमध्येही खरोटे यांच्या सदर छायाचित्राने परीक्षकांच्या  समूहाचे लक्ष वेधून घेत बाजी मारली. एकूणच खंडोबारायाच्या जेजुरीमधील चंपाषष्ठी उत्सवाचा जागतिक स्तरावर जयजयकार झाला आहे.  चंपाषष्ठी उत्सवाचे टिपलेले विजयी छायाचित्र हे तांत्रिकदृष्ट्या कसोटीवर खरे उतरले; मात्र छायाचित्राने सांगितलेला उत्सव व भाविकांचा दिसणारा आनंद परीक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. राष्टÑीय स्तरावरील टॉप-१०मध्ये प्रथम क्र मांक मिळविल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरही घोडदौड कायम ठेवत प्रथम क्र मांक पटकाविणे ही देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे विकीपिडीयाचे भारताकडून स्पर्धेचे संयोजन करणारे प्रमुख संयोजक सुयश द्विवेदी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. राष्टÑीय पातळीवर परीक्षकांच्या समूहात विकीपिडीयाचे सुयश द्विवेदी, स्वप्नील करंबळेकर, श्रेया द्विवेदी, भारतीय पुरातत्व विभागाचे मध्य प्रदेशचे सहायक संचालक यादव, नेहरू सायन्स सेंटरचे सेवानिवृत्त अधिकारी व्ही. व्ही. रायगावकर यांचा समावेश होता. 
सहा वर्षांनंतर पुन्हा भारताची बाजी
विकीपिडीयाच्या वतीने दरवर्षी सदर स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेतून टॉप-१० छायाचित्रे आंतरराष्टÑीय फेरीसाठी दरवर्षी पात्र ठरतात. यापूर्वी २०१२ मध्ये आंतरराष्टÑीय फेरीत भारताकडून पाठविलेल्या दहा छायाचित्रांपैकी एका छायाचित्राने प्रथम क्रमांक राखला होता तर दुसरे छायाचित्र टॉप-१०मध्ये राहिले होते. त्यानंतर सहा वर्षांनी यंदा २०१७च्या स्पर्धेत पाठविलेल्या टॉप-१०मधील छायाचित्रांमध्ये खरोटे यांचे एकमेव छायाचित्र विजयी ठरले.

Web Title:  World trophy kharte has hoisted the tricolor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.