येवला : येथील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी स्वारिपच्या महिला आघाडी अध्यक्ष रेखा साबळे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष राजश्री पहिलवान, पंचायत समिती सदस्य लक्ष्मीबाई गरुड, प्रा. आम्रपाली निकम, अर्जुन कोकाटे, स्वारिपचे तालुका अध्यक्ष महेंद्र पगारे उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आम्रपाली निकम यांनी जिजाऊ, सावित्रीबाई फुले व रमाईमाता यांच्या अथांग त्यागामुळे आज महिलांना सन्मानाचे दिवस आल्याचे सांगितले. यावेळी महेंद्र पगारे यांनी सांगितले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांवर अन्याय-अत्याचार वाढत चालले आहेत. महिलांच्या न्याय व हक्कासाठी मोठे जनआंदोलन उभारणार असून, महिलांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे सांगितले. याप्रसंगी रंजना पठारे, संगीता आहिरे, ज्योती पगारे, सिंधूबाई पठारे, मनीषा शिंदे, रेखा पगारे, शोभा उबाळे, शामाबी शहा, मीराबाई शिंदे, नाजेराबी शहा, वंदना झाल्टे, रुबिनाबी शहा, सोनाली शिंदे, सुरेखा शिंदे, कमलाबाई शिंदे, अलका घोडेराव, साधना सोनवणे, सुरेखा गरुड उपस्थित होत्या. यावेळी विजय घोडेराव, शशिकांत जगताप, आकाश घोडेराव, नवनाथ पगारे, तुळशीराम जगताप, संतोष गायकवाड, सुरेश सोनवणे, हमजा मन्सुरी, अजहर शेख, अजीज शेख, विकास दुनबळे, बाळू आहिरे, विनोद त्रिभुवन, प्रशांत शिंदे, गोरख साबळे, बाबासाहेब गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा अहेर यांनी केले. शीतल अहेर यांनी आभार मानले.
स्वारिपच्या वतीने जागतिक महिला दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 12:09 AM