निकृष्ट काम पाडले बंद

By admin | Published: November 11, 2016 11:20 PM2016-11-11T23:20:48+5:302016-11-11T23:28:50+5:30

ममदापूर : ग्रामपंचायत सदस्य आक्रमक

The worst job is to stop | निकृष्ट काम पाडले बंद

निकृष्ट काम पाडले बंद

Next

ममदापूर : येथे दलित वस्तीत सुरू असलेले निकृष्ट दर्जाचे काम ग्रामपंचायत सदस्यांनी बंद पाडले. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत दलित वस्तीत रस्ता कॉँक्रीटीकरणाचे काम नुकतेच
चालू करण्यात आले; परंतु या ठिकाणी सगळेच नियम धाब्यावर बसवून काम सुरू असल्याने याच वॉर्डातून निवडलेले ग्रामपंचायत सदस्य संजय म्हस्के यांनी सदर काम बंद करून ग्रामसेवक, गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक यांना निवेदन दिले.
सदर ठेकेदाराचे कोणतेही बिल अदा करू नये तसेच ठेकेदाराचा ठेका रद्द करून दुसऱ्या ठेकेदाराला काम देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दलित वस्ती सुधार योजनेसाठी सतरा लाख रुपये निधी मिळाला असून, सात लाखाचे समाजमंदिर व दहा लाख रुपये खर्च करून अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करण्यात येणार आहेत.
रस्त्याचे काम सुरू झाले; परंतु रस्ता खोदून त्यावर मोठे दगड नंतर खडी आसे काम करणे गरजेचे असताना सदर ठेकेदाराने मोठे दगड गोटे ट्रॅक्टरच्या साह्याने बिनारस्ता खोदताच रस्त्यावर टाकून कामाला सुरुवात केली आणि एकाच दिवसात रस्त्यावर मोठे दगड टाकून लगेच आहे. (वार्ताहर)

Web Title: The worst job is to stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.