‘दत्तक नाशिक’च्या घोषणेची वर्षपूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 01:24 AM2018-02-18T01:24:21+5:302018-02-18T01:26:33+5:30
नाशिक : ‘नाशिकला कोणी वाली नाही किंवा नेता नाही, अशी खंत नाशिककरांना वाटते, त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा, मी नाशिक दत्तक घेतो’, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. १८ फेबु्रवारी २०१७ रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या प्रचार सभेत केली होती. या घोषणेला रविवारी (दि.१८) एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, वर्षभरात ‘दत्तक नाशिक’च्या पदरात काहीच पडले नाही, उलट महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळूनही सत्ताधारी भाजपातील अंतर्गत कुरघोडीने शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

नाशिक महापालिकेची सार्वजनिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाली. ध्येयनाम्याचीही प्रतीक्षाच !भाजपाने जाहीर केलेल्या ध्येयनाम्यातील एकही बाब वर्षभरात अंमलात आली नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे. ध्येयनाम्यात ६०० खाटांचे रुग्णालय तसेच मेट्रो आणि मोनोरेलसाठी चाचणी, बहुमजली पार्किंग, पर्यावरणपूरक बससेवा, ई-रिक्षा, तपोवन पर्यटन विकास, क्रीडा प्रबोधिनी, आय.टी. हब, रोजगार निर्मिती, शहरात सीसीटीव्ही, मनपा रुग्णालयात जन्मास येणाºया मुलींसाठी ‘बेटी बचाव’ योजनेअंतर्गत पाच हजार रुपये आदी आश्वासने दिलेली आहेत. परंतु, या ध्येयनाम्यात बससेवा ताब्यात घेण्याला चालना देण्याव्यतिरिक्त एकही ठोस काम झाले नसल्याचे चित्र आहे. नाशिकच्या हाती भोपळा मिळाला आहे. नाशिककरांनी मोठ्या विश्वासाने भाजपाच्या हाती सत्ता दिली. परंतु, वर्षभरात निराशाच पदरी पडली आहे. आपापसातील भांडणानेच यांनी नाशिककरांचे मनोरंजन केले आहे.
- शाहू खैरे, गटनेता, कॉँग्रेसभाजपाने वर्षभरात केवळ गाजरेच दाखविली. शहर विकास आराखड्यातील जाचक अटीही ते बदलू शकलेले नाहीत.
- गजानन शेलार, गटनेता, रा.कॉँ.मुख्यमंत्र्यांनी नाशिककडे जातीने लक्ष पुरवले आहे. स्मार्ट लायटिंग योजना राबविली जाणार आहे. नगरसेवकांना ७५ लाखांचा निधी देऊन त्यांच्या प्रभागात विकासाची कामे उभी राहणार आहेत. निधीसाठी काही प्रकल्पांचे डीपीआर पाठविले आहे.
- संभाजी मोरुस्कर, गटनेता, भाजपा