दिंडोरी : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा आॅनलाइन निकाल जाहीर झाला असून, दिंडोरी तालुक्याचा निकाल ७३ टक्के लागला आहे. दिंडोरी तालुक्यातून एकूण ५,०२३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३,६६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.दिंडोरी तालुक्यात विशेष प्रावीण्यमध्ये ५०८ विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये १४९६, द्वितीय श्रेणीमध्ये १५०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर १६९ विद्यार्थी पास क्लासमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा भनवड, संताजी इंग्लिश मीडिअम स्कूल वणी, किसनलालजी बोरा इंग्लिश मीडिअम स्कूल वणी व निर्मिती इंग्लिश मीडिअम स्कूल कोराटे या शाळांचा निकाल १०० टक्के लागला. सर्वात कमी निकाल तिसगाव येथील जनता विद्यालयाचा ३५ टक्के इतका लागला आहे.दिंडोरी तालुक्याचा दहावीच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेने यंदा मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून आले.शाळांचे निकालदिंडोरी जनता इंग्लिश स्कूल(७५ टक्के), केआरटी मोहाडी (६७ टक्के), सी.एस. विद्यालय खेडगाव (६३ टक्के), महात्मा फुले विद्यालय जानोरी (६६ टक्के), शरद पवार माध्यमिक विद्यालय निगडोळ (९२ टक्के), बी. के. कावळे राजारामनगर (९६ टक्के), केआरटी हायस्कूल वणी (६० टक्के), जनता विद्यालय उमराळे बुद्रुक (६१ टक्के), उन्नती माध्यमिक विद्यालय तळेगाव (७३ टक्के), ढकांबे विद्यालय (७७ टक्के), मातेरेवाडी विद्यालय (७५ टक्के), वरखेडा विद्यालय (६७ टक्के), लोखंडेवाडी (८३ टक्के), कोशिंबे( ८८ टक्के), पिंपरखेड (८२ टक्के), करंजवन (७१ टक्के). निकालाची सरासरी पाहता ेगेल्यावर्षीपेक्षा निकालाची टक्केवारी घसरली आहे.
दिंडोरीमधील चार शाळांनी यंदा ठोकले शतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 12:36 AM
दिंडोरी : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा आॅनलाइन निकाल जाहीर झाला असून, दिंडोरी तालुक्याचा निकाल ७३ टक्के लागला आहे. दिंडोरी तालुक्यातून एकूण ५,०२३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३,६६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
ठळक मुद्देतालुक्याचा निकाल ७३ टक्के। निकालात घसरण