येवला : ब्रह्माकुमारी केंद्राच्या वतीने येवला तालुक्यात सुरू असलेल्या संगीतमय योग शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील पटेल कॉलनी गार्डन, विठ्ठल रु क्मिणी लॉन्स, अंदरसूल, सायगाव जिल्हा परिषद शाळा आणि इंग्लिश मीडिअम स्कूल, स्वामी विवेकानंद विद्यालय, एरंडगाव व येवल्यातील क्र ीडा संकुलात सुरू असलेल्या या शिबिरांना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भेटी दिल्या व उपक्रमाचे कौतुक केले.तिरंगा वेशभूषेत महिलांनी अतिथींचे औक्षण केले. स्वागत नृत्य जान्हवी वीटनोर, खुशी भुजबळ यांनी सादर केले. ब्रह्माकुमारी नीतादीदी यांनी संस्थेच्या परिचय करून दिला. योगा संचालक उज्ज्वल कापडणीस यांनी योगाचे महत्त्व आणि इतिहास यावर मार्गदर्शन केले. येवला ब्रह्माकुमारीज २०२० सालच्या मराठी दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनुदीदी, मकरंद सोनवणे, अॅड. शंतनू कांदळकर, अनुराधादीदी उपस्थित होत्या. संधिवात, आयवात, मायग्रेन, चिकुन गुन्या, पाठदुखी, हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, वजन कमी होते यासह अनेक आजारांवर संगीतमय योग रामबाण ठरला आहे. शरीराला स्वास्थ्य व मनाला आनंद देणाऱ्या या शिबिरात सहभाग घ्या, असे आवाहन ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने नीतादीदी यांनी केले आहे. नाना कुºहाडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कापसे पैठणी उद्योगसमूहाचे दिलीप खोकले, अंबादास बनकर, बंडू क्षीरसागर, बाळासाहेब लोखंडे, राधाकृष्ण सोनवणे, वसंत पवार, सरोजिनी वाखारे,शीतल शिंद आदी उपस्थित होते.
संगीतमय योग शिबिरास येवलेकरांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 10:17 PM