येवला : तालुक्यात पाणीटंचाईची समस्या डोके वर काढत असून सध्या २० गावांसह ११ वाड्यांना १३ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. असे असले तरी ५ गावे आणि ६ वाड्यावस्त्यांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याने या गाव-वाड्यांनी पंचायत समितीकडे टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे.तालुक्यातील जायदरे, आहेरवाडी, कोळगाव, ममदापूर, खरवंडी, देवदरी, वाईबोथी, आडसुरेगाव, रेंडाळे, कोळम खुर्द व बुद्रुक, वसंतनगर, भुलेगाव, कासारखेडे, देवठाण, खामगाव, चांदगाव, पन्हाळसाठे, भायखेडा, पिंपळखुटे ३ रे आदी २० गावांसह ममदापूर तांडा, तळवाडे शिवाजी नगर, गोरखनगर तांडावस्ती, बोराडे वस्ती, अनकाई जाधववस्ती, भगतवस्ती, वाघवस्ती, चव्हाणवस्ती, नगरसूल घनामाळी मळा, बागलवस्ती, राणूमाळी मळा, बारवाचा मळा, दाद मळा, सोनवणेवस्ती, पहाडेवस्ती, मोठा मळा, चिखलीवाडी, मुळबाई घाट, कटकेवस्ती, कापसेवस्ती, महादेवनगर, गणेशनगर, मानमोडी, नांदगावरोडवस्ती आदी ११ वस्त्यांना सद्यस्थितीत ६ शासकीय व ७ खासगी अशा एकूण १३ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.वाघाळे, नायगव्हाण, सोमठाण जोश, लहीत, राजापूर ३ वाड्या वस्त्या, ममदापूर २ वाड्या वस्त्या, पांजरवाडी, सायगाव महादेव वाडी या ५ गावे आणि ६ वाड्या वस्त्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. या गावांचे पाणी मागणी प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झाले असता पंचायत समितीने ती गावे, वाड्यावस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचे प्रस्ताव मंजुरीसाठी प्रांताधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलेले आहेत.
येवला तालुक्यात पाणी मागणीच्या प्रस्तावात झाली वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2021 11:24 PM
येवला : तालुक्यात पाणीटंचाईची समस्या डोके वर काढत असून सध्या २० गावांसह ११ वाड्यांना १३ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. असे असले तरी ५ गावे आणि ६ वाड्यावस्त्यांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याने या गाव-वाड्यांनी पंचायत समितीकडे टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे.
ठळक मुद्दे२० गावे, ११ वाड्यावस्त्यांना १३ टँकरनी पाणीपुरवठा सुरू