नाशिक : जीवनात परिश्रम करताना सातत्य हवे; मात्र त्यासोबत निष्ठा व प्रामाणिकपणाची जोड दिल्यास ध्येय साध्य करणे अधिक सोपे होते. आपण करत असलेल्या कार्याचे स्वत: अवलोकन करून त्रुटी शोधण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून जीवनाच्या यशोमार्गातील अडथळ्यांवर मात करता येईल, असा सूर विद्यार्थी सांसद परिषदेतून उमटला.निमित्त होते, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या वतीने आयोजित ‘नाशिक व्हिजन-२०१८’चे. गुरुवारी (दि.४) विश्वास लॉन्स येथे पार पडलेल्या या परिषदेत ‘मी आणि माझी कारकीर्द’ या विषयावर मान्यवरांनी मुक्त संवाद साधला. प्रमुख वक्ते म्हणून अभिनेता राहुल सोलापूरकर, वैभव मांगले, कवी संदीप खरे, युवा उद्योजक मकरंद पाटील, मराठी चित्रपटसृष्टीचे जनसंपर्क अधिकारी गणेश गारगोटे उपस्थित होते.दरम्यान, आपल्या कारकिर्दीचा प्रवास उलगडताना खरे म्हणाले, आयुष्य सोपं-अवघड या दोन गोष्टींचे मिश्रण असते. आपल्या आयुष्याकडे आपण कसे बघतो, ते जास्त महत्त्वाचे आहे. मला परीक्षेच्या कालावधीत चौथीला असताना पहिल्यांदा कविता सुचली. पुढे कविता माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनली. श्याम पाडेकर यांनी वक्त्यांशी संवाद साधला. प्रारंभी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार व विद्यार्थी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, विद्यार्थी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.कलेचा वारसा हा अनुवांशिक असतो. आजोबांपासून आमच्या घरात क लेचा वारसा चालत आला. कलेचे बालकडू मिळाल्याने शिक्षकीपेशात रमू शकलो नाही. कलेचा प्रवास करताना मुंबईत पोहचलो. विविध चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी लाभली. या प्रवासात वैयक्तिक शिस्तीला मी महत्त्व दिले व हा गुण दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्याकडून मला शिक ण्यास मिळाला. शिस्तीचा प्रभाव माझ्या विचारांवर झाल्याने मी कार्याला न्याय देऊ शकलो.- वैभव मांगले, अभिनेताशालेय स्नेहसंमेलनातील अनुभव मला खूप काही शिकवून गेला. प्रथमच मी शाळेच्या रंगमंचावर श्रीकृष्णाची भूमिका साकारली; मात्र हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय होता तसा तो तसा भयानकही होता. आपण स्वीकारलेल्या भूमिकेतून शक्यतो कधीही बाहेर पडू नये, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते, हा मूलमंत्र मला त्यावेळी शाळेच्या रंगमंचावरून मिळाला.- राहुल सोलापूरकर, अभिनेता
आपल्या कार्यामधील त्रुटींचा आपणच शोध घ्यावा : नाशिकमध्ये विद्यार्थी सांसद परिषदेत उमटला सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 10:03 PM
कलेचा वारसा हा अनुवांशिक असतो. आजोबांपासून आमच्या घरात क लेचा वारसा चालत आला. बालपणीच कलेचे बालकडू मिळाल्याने शिक्षकीपेशात रमू शकलो नाही.
ठळक मुद्दे ‘मी आणि माझी कारकीर्द’ या विषयावर मान्यवरांनी मुक्त संवाद साधला ‘नाशिक व्हिजन-२०१८’चे