मांडवड : लक्ष्मीनगर या गावातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतात मातीपेक्षा त्यामध्ये दगड-गोटेच अधिक असल्याने शेतीकरणे अतिशय अवघड होत असल्याने त्यावर पयार्य म्हणून येथील एका युवकाने कातीमधून दगड-गोटे वेगळे करण्याचे मशीन उपलब्ध करुन लक्ष्मीनगरातील शेतकऱ्यांना एक नवा प्रयत्न करीत शेती चांगली व्हावी या करीता मदत सुरु केली आहे, त्याच बरोबर स्वत:साठी शेतीपुरक व्यवसायही निवडला आहे.नांदगाव तालुक्यातील शाकंबरीच्या तिरावर वसलेलं लक्ष्मीनगर छोटस गांव, गावात धरण आहे, पण शेतीसाठी कसेबसे पाणी पुरते. शिवाय खडकाळ रानात पाणी पुरत नाही. बऱ्याच शेतात मातीपेक्षा दगडच जास्त असल्याने शेतीची मशागत ही निट करता येत नाही. त्यामुळे पिकंही व्यवस्थित हाती येत नाही आणि त्यामुळे शेती मालाला भाव मिळत नाही. त्यात अस्मानी संकट नेहमीच हजर असतात यासर्व कठीण चक्रातून आपण काही तरी शेतीला पुरक असा व्यवसाय केला पाहिजे आणि रानातले दगड कमी केले पाहिजे हि कल्पना गावातील ईश्वर सोनवणे ह्या युवकाला सतत डोक्यात खदखदत होती.शेतातील दगड कमी करायच मशीन घेण्यासाठी त्याचा शोध सुरु झाला. जिल्ह्यातील बऱ्याच संबंधित व्यापारीवर्गाशी बोलणं झालं. पण तस मशीन नसल्याचे समजले. त्यानंतर सोशल मिडियावर चर्चा केली आणि यु ट्युबच्या माध्यमातून शेतातून दगड जमा करण्याच्या मशीनचा पत्ता लागला तो थेट मध्यप्रदेशातील एका गावात. फोनवरून बोलणं झाल आणि ईश्वरने आपले मित्र पोपट महाडिक यांच्या सह मध्यप्रदेश गाठल आणि (स्टोन पिकर) मशीनचा व्यवहार सहा लाख रूपयांना झाला. मात्र आपल्या गावी न्यायच कस ट्रान्सपोर्टचा खर्च खुपच होता. तर ईश्वरने स्वत: आपला ट्रॅक्टर मध्यप्रदेशात नेला, आणि त्याला जोडून स्टोन पिकर लक्ष्मीनगरात आपल्या गावी आणला. त्यानंतर गावात प्रत्येकाला माहिती देत गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील दगड-गोटे काढण्याचे काम सुरु झाले. पर्यायाने ईश्वर ह्या युवकाचा शेतीबरोबरच नविन व्यवसाय सुरु झाला आज ईश्वर शेतातील दगड जमा करण्याचे काम जोमाने करत आहे.शिवाय सध्या सर्वत्र जमीन पिक नसल्याने मोकळी आहे. त्यामुळे गावातील व परिसरातील शेतकरी देखिल मोठ्या संख्येने या मशीनची मागणी करत आहे. या मशिनमुळे शेतातील दगड कमी होउन शेतातील मशागत चांंगली केली जाऊ शकते, शिवाय शेत जमीन भुसभुशीत तयार होत आहे..या मशीनद्वारे मोठे दगड उचलले जाऊन फक्त बारीक दगड खाली शिल्लक राहतात व मशीनमध्ये जमा झालेले दगड हे ट्रालीमध्ये टाकून शेताच्या बाहेर काढले जातात. शिवाय योग्य दरात हे काम होत असल्याने कमी वेळेत काम होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची या स्टोन पिकरला गावात मागणी मागणी वाढत आहे. या कोरोनाच्या काळात ही ईश्वरने जिद्दीने व मेहनतीने मनातील कल्पना प्रत्यक्षात उतरविल्याने परिवारात व गावात त्याचे कौतुक केले जात आहे.ईश्वरची कल्पना ही वेगळीच वाटली परंतु त्या कल्पनेला मार्ग मिळत गेला आणि हे मशीन प्रत्यक्षात समोर आल्याने जमिनीतील दगड कमी झाल्याने जमिनीची सुपिकता वाढून शेतकऱ्यांना याचा निश्चित फायदा होत आहे.- पोपटराव महाडिक, शेतकरी, लक्ष्मीनगर.
लक्ष्मीनगरच्या तरुणाने शोधला शेतीपुरक व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2021 11:05 PM
मांडवड : लक्ष्मीनगर या गावातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतात मातीपेक्षा त्यामध्ये दगड-गोटेच अधिक असल्याने शेतीकरणे अतिशय अवघड होत असल्याने त्यावर पयार्य म्हणून येथील एका युवकाने कातीमधून दगड-गोटे वेगळे करण्याचे मशीन उपलब्ध करुन लक्ष्मीनगरातील शेतकऱ्यांना एक नवा प्रयत्न करीत शेती चांगली व्हावी या करीता मदत सुरु केली आहे, त्याच बरोबर स्वत:साठी शेतीपुरक व्यवसायही निवडला आहे.
ठळक मुद्देस्वत:साठी शेतीपुरक व्यवसायही निवडला आहे.