सिन्नरला डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण वाढले
सिन्नर : शहर व उपनगरात डासांचे प्रमाण वाढले असून, डेग्युसदृश आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. याबाबत डास प्रतिबंधक औषध फवारणी करून परिसरात स्वच्छ करावा. डेग्यूबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे. शिव नदी, देव नदीची स्वच्छता करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
विवेकानंद यांना स्मृतिदिनी अभिवादन
सिन्नर: ‘समुद्रावरील शिवाजी’ असे संबोधन असलेले सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या व भारतीय संस्कृती आणि युवकांचे प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत ठाणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जनसेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रामदास भोर, बाबूराव शिंदे, अर्जुन आव्हाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
भोकणी येथे वृक्षारोपण
सिन्नर : तालुक्यातील भोकणी येथे सरपंच अरुण वाघ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास मंचच्या माध्यमातून पाच हजार वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. आत्तापर्यंत १५०० रोपांची लागवड करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत प्रसिद्ध रानकवी तुकाराम धांडे आणि कवी रवींद्र कांगणे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत भोकणी येथे वृक्षारोपण करण्यात आले.
गळफास घेऊन इसमाची आत्महत्या
सिन्नर : झाडाचा दोर बांधून ४५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिगंबर भीमराव ढगे (४५) असे मयत इसमाचे नाव असून ते दापूर येथील रहिवासी आहे. हल्ली ते वडगाव-सिन्नर येथे वास्तव्यास होते. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. हवालदार सारुक्ते अधिक तपास करीत आहेत.