गोदावरी नदीत युवकाचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 12:03 PM2019-05-26T12:03:50+5:302019-05-26T12:04:13+5:30
रविवारी सकाळी कोठुरे येथे गोदावरी नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेला करण विजय जाधव रा, कसबे सुकेणे (19) या युवकाचा बुडून मृत्यू झाला.
नाशिक - रविवारी सकाळी कोठुरे येथे गोदावरी नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेला करण विजय जाधव रा, कसबे सुकेणे (19) या युवकाचा बुडून मृत्यू झाला. तो एकुलता एक होता.
विविध धरणातून नगर जिल्ह्यासाठी गोदावरी नदीत पाणी सोडल्याने कोठुरे येथे परिसरातील गावांमधून पोहण्यासाठी येणाऱ्यांची सकाळी गर्दी असते रविवारी कसबे सुकेणे येथून सकाळी चारचाकी वाहनातून घरातील नातेवाईकासह करण हा कोठुरे येथे पोहायला आला होता सकाळी 6 च्या दरम्यान करणं फ्लोटरसह गोदावरी नदीच्या पात्रात पोहत असताना फ्लोटरचा गट्टू निसटल्याने करणं खोल पाण्यात बुडाला, ही घटना लक्षात येताच चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाचे तरुण व निफाड येथील भोई समाजाच्या तरुणांना पाचारण करण्यात आले या तरुणांनी वेगाने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला अखेर 8 वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह मिळून आला करण हा निसाकाचे माजी संचालक बाळासाहेब माधवराव जाधव यांचा नातू होय.
मागील आठवड्यात याच गोदावरी नदीत पिंपळस येथील 1 आणि श्रीरामनगर येथील 1 असे एकूण दोन तरुण एकाच वेळेस बुडून मरण पावल्याची घटना ताजी असताना पुन्हा अशी घटना घडल्याने हळहळ व्यक्त आहे आठ दिवसाच्या अंतरात गोदावरी पात्रात बुडून 3 तरुणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.