खडक माळेगावला युवामहोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 10:31 PM2020-01-22T22:31:43+5:302020-01-23T00:16:32+5:30
खडक माळेगाव येथे ‘सांज पाखरांची’ या सांस्कृतिक कार्यक्र माने युवा महोत्सवाला प्रारंभ झाला. जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, छ. शिवरायांची स्फूर्तिदायक गिते तसेच खंडेरायाची गिते व नृत्याविष्कार सादर केला.
लासलगाव : खडक माळेगाव येथे ‘सांज पाखरांची’ या सांस्कृतिक कार्यक्र माने युवा महोत्सवाला प्रारंभ झाला.
जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, छ. शिवरायांची स्फूर्तिदायक गिते तसेच खंडेरायाची गिते व नृत्याविष्कार सादर केला.
महोत्सवाचे उद्घाटन सरपंच तेजल रायते, लासलगावचे पोलीस उपनिरीक्षक खंडेराव रंजवे, महोत्सव समितीचे विकास रायते यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर प.सं. उपसभापती शिवाजी सुरासे, शशांक शिंदे, सुरेश धारराव, नामदेव रायते, बाबाजी रायते, मुख्याध्यापक लचके, विलास देवरे, विठ्ठल कान्हे, संदीप गारे उपस्थित होते.
सांज पाखरांची या कार्यक्रमात सेमी इंग्रजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक नृत्य, सामूहिक नृत्य, सामाजिक व देशभक्तीपर संदेश देणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाप्रसंगी अश्वावर स्वार छ. शिवाजी महाराजांचे आगमन कौतुकाचा विषय ठरला. विद्यार्थ्याने शिवाजी महाराजांची भूमिका केली होती. शिवघोषणांनी परिसर दणाणून गेला होता. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराने वाहवा मिळवली. यावेळी शिक्षक, पालक उपस्थित होते.