नाशिक : पारिजातनगर सिग्नलवरून वनविहार कॉलनीमार्गे भरधाव जात असलेल्या एका केटीएम बाइकस्वाराने (एमएच १५, डीएन ७३७०) अॅक्टीवा मोपेड दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत अॅक्टीवा (एमएच १५, जीजी १८७३) चालविणारा युवक विशाल नागेश लहांगे हा गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, केटीएम बाइकस्वार हा प्रचंड वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत जात असताना हा अपघात घडला. अॅक्टीवावरील दुसरा युवक जीवन दत्तू कासोदे (२२) हादेखील गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात केटीएम बाइक भरधाव चालविणारा साहील अनिल पसरिचा यालाही जबर मार लागला, मात्र त्याने अपघाताची माहिती पोलिसांना न देता घटनास्थळावरून पळ काढल्याचे त्र्यंबक बबन झोले (३५, रा. एरिगेशन कॉलनी, मखमलाबाद नाका) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात पोलिसांनी पसरिचा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक डी. एल. माळी हे करीत आहेत.
काठेगल्लीत एक लाखाची घरफोडीकाठेगल्ली परिसरातील आदित्य भवनात राहणारे चंद्रकांत केशव हुंडीकर (६६) हे त्यांच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी तिडके कॉलनीत आले होते. याचाच फायदा घेत त्यांचे बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून घरातील सुमारे १ लाख ९ हजार ३०० रुपयांचे दागिने व रक्कम लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी हुंडीकर यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.मोबाईल हातातून हिसकावलानाशिक शहर व परिसरात पादचाऱ्यांच्या हातातून मोबाईल हिसकावण्याच्या घटना पुन्हा वाढल्या आहेत. तीन दिवसांपुर्वीच इंदिरानगर गुन्हे शोध पथकाने दोघा मोबाईल स्नॅचरांना रंगेहाथ ताब्यात घेत त्यांच्याकडून १ लाख रूपये किंमतीचे चोरीचे मोबाईल हस्तगत केले; मात्र पुन्हा पाथर्डी शिवारातील एका शिवमंदिरासमोरून मयुर अंबुश्ािंग पाटील (१९,रा.नरहरीनगर) हा युवक मोबाईलवर बोलत पायी जात असताना पांढºया रंगाच्या अॅक्टीवा दुचाकीवरून आलेल्या दोघा युवकांपैकी चालकाने त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. विवो कंपनीचा सुमारे १६ हजार रूपये किंमतीचा स्मार्टफोन चोरी झाल्याची फिर्याद पाटील याने इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली आहे