सिन्नर : येथील वंजारी समाज मैदानावर ६५व्या जिल्हा अजिंक्यपद जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेच्या दुसºया दिवशी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहावयास मिळाला. पहिल्या दिवशी ३२, तर दुसºया दिवशी ३६ सामन्यांचा रोमांच प्रेक्षकांनी अनुभवला. जिल्ह्यात प्रथमच एवढ्या भव्य स्वरूपात स्पर्धा पार पडत असल्याने खेळाडूंच्या उत्साहालाही भरते आल्याचे दिसून आले. भव्य व आकर्षक मैदान, खच्चून भरलेली प्रेक्षकांची गॅलरी, उत्कृष्ट समालोचन आणि आयोजकांचा दांडगा उत्साह यामुळे सिन्नरनगरी कबड्डीमय झाल्याचे दिसत आहे. प्रत्येक सामना जिंकण्यासाठी खेळाडूंमध्ये असलेली जिद्द आणि उत्कृष्ट पंच यामुळे स्पर्धेमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. सिन्नर तालुक्यासह जिल्हाभरातून प्रेक्षकांची उपस्थिती लाभत असल्याने खेळाडूंना प्रोत्साहन मिळत आहे. स्पर्धेसाठी आंतरराष्टÑीय व देशपातळीवर पंच असल्याने निपक्षपातीपणे निर्णय होत आहेत. कबड्डी स्पर्धेत मुलांच्या ४८ संघांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कबड्डीचे ३२ सामने झाले, तर दुसºया दिवशी ३६ सामन्यांचे नियोजन होते. १५ गटातून विजयी झालेल्या संघात आज (मंगळवारी) बाद फेरीचे सामने होणार आहेत. त्यानंतर उपउपांत्य, उपांत्य आणि अंतिम सामने होणार आहेत. मंगळवारी बाद फेरीचे ९ सामने होतील. त्यानंतर सायंकाळी कबड्डी स्पर्धेचा विजेता संघ ठरणार आहे. कराड येथे होणाºया राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी मंगळवारी विजेता होणारा संघ नाशिक जिल्ह्णाचे प्रतिनिधित्व करणार आहे. दरम्यान, स्पर्धेच्या दुसºया दिवशी अनेक लोकप्रतिनिधींसह लायन्स क्लब, वकील संघटना, औषध विक्रेता संघटना यांच्यासह अनेक संस्थांच्या पदाधिकाºयांनी सामन्यांना भेट देऊन आयोजनाचे कौतुक केले. या स्पर्धेत ४८ मुलांच्या संघांनी सहभाग घेतला असून, आजपर्यंत जिल्हा पातळीवर झालेल्या कबड्डी स्पर्धेतील हा उच्चांक आहे. कबड्डी संघटनेचे समन्वयक उदय सांगळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी दोन दिवसापासून मैदानावर तळ ठोकून स्पर्धेचे नियोजन पहात आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धा : क्रीडारसिकांची उत्स्फूर्त गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:05 AM