नांदगांव : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोविड १९ संबंधातील उपाय योजनांची नांदगाव, मनमाड, हिसवळ येथे पाहाणी केली. यावेळी विलगीकरण कक्ष, ऑक्सिजन यंत्रणा तसेच तालुकास्तरावरील लसीकरण यांचा आढावा घेतला.हिसवळ विलगीकरण केंद्रास भेट देतांना त्यांनी रुग्णांशी देखील संवाद साधला. आरोग्य यंत्रणेच्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखांना प्रत्येक तालुक्याची जबाबदारी देण्यात आली असून मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड या स्वत: जिल्ह्यात सर्वत्र फिरून पुढील काळात आढावा घेणार आहेत.नांदगाव येथील दौऱ्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डावल साळवे, कार्यकारी अभियंता सुनंदा नरवडे यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिप मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नांदगाव, मनमाड, हिसवळ येथे पहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 9:10 PM
नांदगांव : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोविड १९ संबंधातील उपाय योजनांची नांदगाव, मनमाड, हिसवळ येथे पाहाणी केली. यावेळी विलगीकरण कक्ष, ऑक्सिजन यंत्रणा तसेच तालुकास्तरावरील लसीकरण यांचा आढावा घेतला.
ठळक मुद्देहिसवळ विलगीकरण केंद्रास भेट देतांना त्यांनी रुग्णांशी देखील संवाद साधला.