झिरवाळ यांचे दिंडोरीत जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 01:02 AM2020-03-16T01:02:58+5:302020-03-16T01:03:19+5:30

विधानसभेचे उपाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच दिंडोरी येथे आलेल्या आमदार नरहरी झिरवाळ यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाके फोडत व पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

Zirwal welcomes Dindori | झिरवाळ यांचे दिंडोरीत जल्लोषात स्वागत

विधानसभेचे उपाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच दिंडोरी येथे आलेल्या आमदार नरहरी झिरवाळ यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाके फोडत व पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

Next

विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच दिंडोरीत आलेल्या नरहरी झिरवाळ यांचे कार्यकर्त्यांनी असे खांद्यावर उचलून घेत जल्लोषात स्वागत केले़
दिंडोरी : विधानसभेचे उपाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच दिंडोरी येथे आलेल्या आमदार नरहरी झिरवाळ यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाके फोडत व पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. शहरातील बाजारात झिरवाळ यांनी नागरिकांच्या भेटी घेत आभार मानले. पिंपळनारे, खतवड फाटा, तळेगाव. वलखेड. अवनखेड, लखमापूर फाटा ओझरखेड, वणी आदी ठिकाणी झिरवाळ यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, बाजार समिती सभापती दत्तात्रय पाटील, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, उपसभापती अनिल देशमुख, कादवा संचालक बाळासाहेब जाधव, नगराध्यक्ष रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, गुलाब जाधव, श्याम हिरे, जयवंत जाधव, धनराज भट्टड, गोकुळ झिरवाळ, तौसीफ मणियार आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेटे यांच्यापुढे झिरवाळ नतमस्तक
विधानसभेचे उपाध्यक्ष झाल्यानंतर आमदार नरहरी झिरवाळ यांनी दिंडोरी येथे परतताच आपले राजकीय गुरु व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांच्यासमोर नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. कोणतीही राजकीय पाशर््वभूमी नसताना केवळ आपल्या कामाच्या जोरावर झिरवाळ यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या शेटे यांनी राष्ट्रवादीमध्ये आणत त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती व आमदारकीची संधी दिली. त्या जोरावर झिरवाळ तिसऱ्यांदा आमदार झाले. त्यांचा हा राजकीय प्रवास त्यांच्या कर्तृत्वावर झाला असला तरी शेटे यांनी त्यांच्यातील नेतृत्व गुण हेरत त्यांना दिलेल्या संधीचे त्यानीही सोने केले.

Web Title: Zirwal welcomes Dindori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.