१०७ वर्षांच्या ‘शेफ' मस्तानाम्माचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 05:22 AM2018-12-06T05:22:37+5:302018-12-06T05:22:47+5:30
परंपरागत पद्धतीने स्वयंपाक करण्यात रुची असलेल्यांमध्ये मस्तानम्मा यांच्या अस्सल भारतीय पाककृतींचा यूट्यूब चॅनल विलक्षण लोकप्रिय होता.
विजयवाडा : परंपरागत पद्धतीने स्वयंपाक करण्यात रुची असलेल्यांमध्ये मस्तानम्मा यांच्या अस्सल भारतीय पाककृतींचा यूट्यूब चॅनल विलक्षण लोकप्रिय होता. त्याची कर्तीधर्ती असलेल्या १०७ वर्षे वयाच्या या आजीचे सोमवारी रात्री आंध्र प्रदेशमधील गुंटूर जिल्ह्यातील गुडीवाडा गावी निधन झाले.
मस्तानम्माच्या पाककृतींचे कौशल्य सर्वांसमोर ठळकपणे यावे, या उद्देशाने तिचा नातू लक्ष्मणन व त्याच्या मित्राने मस्तानम्माच्या नावे यूट्यूब चॅनल सुरू केले. त्याच्या दर्शकांची संख्या अल्पावधीतच १८ ते २० लाखांपर्यंत पोहोचली. (वृत्तसंस्था)
>गॅसवर स्वयंपाक नाही
मस्तानाम्माने कधीच गॅसवर स्वयंपाक केला नाही. इंधन म्हणून लाकडे, काटक्यांचा वापर केलेल्या चुलीवर स्वयंपाक करणे तिला मनापासून आवडे. तिचे स्वयंपाकघर असायचे उघड्यावर म्हणजे शेतजमिनीत एखाद्या आडोश्याला. तिच्या सर्वच पाककृती अस्सल भारतीय असत; पण त्यातही काही अशा होत्या की त्या बनविण्याची पद्धती तिनेच विकसित केली होती.