लॉकडाउन हटविल्यामुळे भारतासह १५ देशांना रुग्णवाढीचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 03:42 AM2020-06-12T03:42:34+5:302020-06-12T03:43:50+5:30
सुरक्षा संशोधन संस्थेचा निष्कर्ष : ४५ अर्थव्यवस्थांचा अभ्यास; फ्रान्स, इटलीत सुधारणा शक्य
नवी दिल्ली : लॉकडाऊन उठविणाऱ्या भारतासह १५ देश धोक्याच्या उंबरठ्यावर असून तेथे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते,
असा निष्कर्ष एका अभ्यासातून समोर आला आहे. जगातील ४५ अर्थव्यवस्थांचा अभ्यास केल्यानंतर ‘नोमुरा’ संस्थेने हा निष्कर्ष काढला आहे. यात सातत्याने रुग्णवाढ होणाºया तसेच नव्या रुग्णांचे प्रमाण कायम बदलत असलेल्या देशांचाही समावेश होता. यानुसार, १७ देशांमध्ये ‘कोविड-१९’ची दुसरी लाट येण्याची शक्यता नसल्याचे आढळले. १३ देशांमधील परिस्थिती सुधारली असली तरी, तेथे पुन्हा संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. उर्वरित १५ देशांमध्ये दुसरी लाट येण्याचा सर्वाधिक धोका वर्तवण्यात आला आहे.
लॉकडाऊन हटविणाºया या १५ देशांमध्ये अर्थात भारताचाही समावेश आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता नसणाऱ्यांमध्ये फ्रान्स, इटली, दक्षिण कोरिया यांसारख्या देशांचा समावेश आहे. जर्मनी, अमेरिका, इंग्लंड या देशांमध्ये परिस्थिती सुधारत असून तेथे काही प्रमाणात संसर्ग शक्य आहे. भारतासह इंडोनेशिया, चिली, पाकिस्तान, स्वीडन, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, कॅनडा या देशांमध्ये संसर्गाची दुसरी लाट शक्य आहे.
बरे होणाºयांची संख्या वाढण्याची चांगली, अथवा दुसरी लाट येण्याची वाईट शक्यता
च् पहिली शक्यता : पहिली शक्यता अशी आहे की, अमेरिकेप्रमाणे रुग्ण बरे होणाºयांची संख्या वाढीस लागेल. काही प्रमाणात वा पूर्ण लॉकडाऊन उठविण्याचा परिणाम म्हणून आर्थिक व्यवहार सुरू होतील. या काळात नवे रुग्ण वाढतील. मात्र, त्याची संख्या कमी असेल. यामुळे ‘कोविड-१९’ बद्दलची लोकांच्या मनातील भीती कमी होईल आणि लोकांचे आर्थिक व्यवहार अधिक प्रमाणात वाढतील. काही काळानंतर नवे रुग्ण कमी होत जातील. हा टप्पा लाट ओसरत असल्याचे निदर्शक असेल.
च् दुसरी शक्यता : ज्या देशांमध्ये लॉकडाऊन हटविण्यात आले, तेथे रुग्णवाढीचा वेग जास्त असेल. लोक बाहेर पडल्याने व्यवहार वाढतील. मात्र, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नवे रुग्ण आढळतील. असे झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल. यामुळे साहजिकच लोकांच्या बाहेर पडण्यावर आणि पर्यायाने
दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर मर्यादा येईल. ही शक्यता वास्तवात उतरल्यास काही देशांमध्ये किंवा देशातील
काही भागांमध्ये पुन्हा
लॉकडाऊन जारी केले जाऊ शकते.