बलवंत तक्षकलोकमत न्यूज नेटवर्कचंडीगड : पंजाबमधील मोहालीच्या चंडीगड विद्यापीठात विद्यार्थिनींच्या स्नानाचे व्हिडीओ व्हायरल केल्याच्या प्रकरणातील आरोपी विद्यार्थिनीच्या मोबाइलमधून आणखी १५ आक्षेपार्ह व्हिडीओ हस्तगत करण्यात आले आहेत. यात विद्यार्थिनींचा चेहरा दिसत नाही. या प्रकरणात एसआयटीने आरोपींना समोरासमोर बसवून सहा तास चौकशी केली. यापूर्वी अटक केलेल्या विद्यापीठातील खानावळीत काम करणारा मोहित याच्या मोबाइलमधून पोलिसांना ३३ व्हिडीओ आढळले आहेत.
तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे पोलिसांचे सर्व दावे खोडून निघत आहेत. सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे की, अखेर ते या व्हिडीओचे काय करीत होते? हे व्हिडीओ पुढे कोणाकोणाला पाठविण्यात आले. ते कोणाच्या संपर्कात होते? प्रकरण समोर आल्यानंतर मोबाइलमधून चॅट व व्हिडीओ डिलीट का करण्यात आले? एसआयटीने सांगितले की, हे प्रकरण वरचेवर गंभीर होत चालले आहे. एसआयटीला विद्यार्थिनींनी सांगितले की, काही विदेशी नंबरवरून चुकीची माहिती पसरवली जात आहे.