स्थलांतरित मजुरांच्या रोजगारावर झालेत १६ हजार कोटी खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 06:40 AM2020-08-22T06:40:58+5:302020-08-22T06:41:04+5:30

आतापर्यंत १६ हजार ७६८ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून २१ कोटी मनुष्यदिन रोजगार उपलब्ध करण्यात आला आहे.

16,000 crore has been spent on the employment of migrant workers | स्थलांतरित मजुरांच्या रोजगारावर झालेत १६ हजार कोटी खर्च

स्थलांतरित मजुरांच्या रोजगारावर झालेत १६ हजार कोटी खर्च

Next

नवी दिल्ली : कोविड -१९ मुळे विविध राज्यांमधून स्थलांतरित झालेल्या मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण रोजगार अभियानाची सुरुवात केली. याअंतर्गत आतापर्यंत १६ हजार ७६८ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून २१ कोटी मनुष्यदिन रोजगार उपलब्ध करण्यात आला आहे.
केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, ओडिशा, राजस्थान तसेच उत्तर प्रदेश या सहा राज्यातल्या ११६ जिल्ह्यातील स्थलांतरितांना रोजगार उपलब्ध करवून देण्याचे काम या योजनेअंतर्गत केले जात आहे. अभियानांतर्गत केंद्राकडून आतापर्यंत १६ हजार कोटींहून अधिकचा निधी खर्च करून विकासकामे करण्यात आली आहेत.
> 16,768 कोटी रुपये अभियानाच्या सातव्या आठवड्यांपर्यंत या राज्यात २१ कोटी मनुष्यदिन रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. त्यासाठी १६,७६८ कोटी खर्च करण्यात आले. कार्यक्षेत्राअंतर्गत
77 हजार ९७४ जलसंधारण बांधकामे, २.३३ लाख ग्रामीण भागातील घरकुल, १७,९३३ गोठे, ११ हजार ३७२ शेततळी, ३ हजार ५५२ सार्वजनिक शौचालयांची बांधकामे उभारण्यात आले.
6,300 कामे जिल्हा मिनरल निधीतून करण्यात आली आहेत. ७६४ ग्रामपंचायतींना इंटरनेटशी जोडण्यात आले आहे. अभियानाद्वारे २५ हजार ४८७ उमेदवारांना कृषी विज्ञान केंद्रातर्फे कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले.

Web Title: 16,000 crore has been spent on the employment of migrant workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.