१९ वर्षात घेतली कोटींची उडाणे बीएचआर : २४ हजार भागधारक तर १ लाख ४४ हजार नाममात्र सभासद (भाग-१)
By Admin | Published: November 26, 2015 11:58 PM2015-11-26T23:58:04+5:302015-11-26T23:58:04+5:30
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेने १९ वर्षात ठेवी, कर्जवाटप आणि भाग भांडवलाची कोटीच्या कोटी उडाणे घेतली. संस्थेसाठी २४ हजार १५८ सदस्यांनी भागभांडवल उभे केले आहे. तर एक लाख ४४ हजार ६८१ नाममात्र सभासद संस्थेकडे आहेत.
ज गाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेने १९ वर्षात ठेवी, कर्जवाटप आणि भाग भांडवलाची कोटीच्या कोटी उडाणे घेतली. संस्थेसाठी २४ हजार १५८ सदस्यांनी भागभांडवल उभे केले आहे. तर एक लाख ४४ हजार ६८१ नाममात्र सभासद संस्थेकडे आहेत.९ राज्यात चालतो बीएचआरचा व्यवहारमहाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, दिल्ली, गोवा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व छत्तीसगड या राज्यातील २४३ शाखांच्या माध्यमातून बीएचआर पतसंस्थेचे व्यवहार सुरु करण्यात आले. जळगाव, पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, यवतमाळ, बुलढाणा यासह राज्यभरात शाखा आहेत. बीएचआर पतसंस्थेला वाढता प्रतिसाद पाहता २०१२/१३ या वर्षात संस्थेने २९ नवीन शाखा सुरु केल्या. २०१३/१४ या वर्षभरात तब्बल ६६ नवीन शाखा कार्यान्वित करण्यात आल्या.भागभांडवल आणि ठेवींमध्ये वाढबीएचआर पतसंस्थेबाबत सभासद, भागधारक आणि ठेवीदारांमध्ये प्रचंड विश्वास निर्माण झाल्यामुळे प्रत्येक वर्षी भागभांडवल व ठेवींमध्ये वाढच होत गेली. २०१३/१४ या आर्थिक वर्षात बीएचआर पतसंस्थेकडे तब्बल ७३७ कोटी २७ लाख ८९ हजारांच्या ठेवी जमा झाल्या होत्या. वर्षभरात ठेवीच्या प्रमाणात तब्बल ५१.९६ टक्के वाढ झाली होती. या वर्षात सभासदांना ७६ लाख ७३ हजार रुपयांच्या लाभांशाचे वाटपदेखील करण्यात आले.८८६ कोटींच्या कर्जवसुलीचे आव्हानबीएचआर पतसंस्थेत जमा झालेल्या ठेवीच्या रकमेचा संस्थेकडून विनियोग करण्यात आला. २०१३/१४ या वर्षात कर्ज व ॲडव्हान्सेस यावर पतसंस्थेने ८८६ कोटी २४ लाख १४ हजार रुपये खर्च केला आहे. कर्ज व ॲडव्हॉन्स स्वरुपात दिलेल्या रकमेच्या वसुलीचे आव्हान नवनियुक्त अवसायक यांच्यावर आहे. यासह संस्थेनेे ९४५६.५० लाखांची जंगम व स्थावर मालमत्तेत गुंतवणूक केली आहे. संस्थेचे अन्य मार्गानी येणारी रक्कम ही २७६४.०५ लाख आहे. २०१४/१५ या आर्थिक वर्षात या आकड्यांमध्ये काही प्रमाणात ही भर पडलेली होती.