वऱ्हाडाचा ट्रक 60 फुटांवरुन नदीत कोसळला, 21 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 11:29 AM2018-04-18T11:29:51+5:302018-04-18T11:29:51+5:30
या दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू झाला, तर 20 जण गंभीर जखमी आहेत.
भोपाळ - मध्यप्रदेशमध्ये वऱ्हाडाला घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू झाला, तर 20 जण गंभीर जखमी आहेत. काल रात्री 9:30 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला आहे. सध्या मिनी ट्रक नदीपात्रातून बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. त्यासाठी क्रेन बोलावण्यात आली आहे. जखमींना नजीकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
21 people have died in the accident & many have been injured. The injured have been taken to the hospital for treatment: Dilip Kumar, Collector on the accident that took place in Sidhi, #MadhyaPradesh where a truck fell into river Son. pic.twitter.com/f1Ouc8iXzM
— ANI (@ANI) April 17, 2018
मध्यप्रदेशमधील सिंगरौली जिल्ह्यातून हा ट्रक लग्नासाठी सीधीच्या दिशेने जात होता, त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे. 60 फूट उंचीवरुन नदीपात्रात ट्रक कोसळला आहे. त्यामुळं मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या दुर्घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे. तसंच मृतांच्या नातेवाईकांना दोन-दोन लाख, तर जखमींना 50-50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
सीधी जिले में सोन नदी के जोगदहा पुल पर हुआ दर्दनाक सड़क हादसा अत्यंत दुखद है। ईश्वर से प्रार्थना है कि दिवंगत आत्माओं को शांति प्रदान करें और घायलों को शीघ्र स्वास्थ्य लाभ मिले। जिन परिवारों ने अपनों को खो दिया है उन्हें संबल प्रदान करें।
— ShivrajSingh Chouhan (@ChouhanShivraj) April 17, 2018