मोदी सरकारच्या विरोधात एकवटले २१ पक्ष; दिल्लीत झाली पहिली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 06:29 AM2018-12-11T06:29:02+5:302018-12-11T06:29:44+5:30

चंद्राबाबू नायडूंचा पुढाकार; भाजपाला सत्तेतून खेचण्याचा निर्धार

21 parties assembled against Modi government; First meeting in Delhi | मोदी सरकारच्या विरोधात एकवटले २१ पक्ष; दिल्लीत झाली पहिली बैठक

मोदी सरकारच्या विरोधात एकवटले २१ पक्ष; दिल्लीत झाली पहिली बैठक

googlenewsNext

- शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर व्हायला अवघे काही तास शिल्लक असताना सगळ््या विरोधी पक्षांच्या नेत्यांना एकत्र येऊन आमचे प्रयत्न भाजपाला दिल्लीतील सत्तेतून खाली खेचण्याचे आहेत, असे संकेत मोदी सरकारला दिले.
दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, देशात मोदी सरकार संघ आणि भाजपाचा कार्यक्रम लादू पाहत आहे. सरकार सतत घटनात्मक संस्थांवर हल्ले करीत आहे व ते थांबवायला हवेत. उतावीळ झालेले हे सरकार दडपण आणून आपल्याला हवे ते निर्णय घ्यायला भाग पाडत आहे. याच कारणामुळे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांना आज राजीनामा देणे भाग पडले.

ते म्हणाले की, देशाला खिळखिळे करणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध जनता आता उभी ठाकत आहे, याचा मला अभिमान आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत व मोदी बँक व्यवस्थेला आपल्या लोकांच्या हाती सोपवण्यास उतावीळ झाले आहेत. राफेलवर पंतप्रधान काही का बोलत नाही? असा सवालही त्यांनी केला. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी बैठक ऐतिहासिक असल्याचे सांगून हे स्पष्ट केले की, भाजपाविरोधी व्यासपीठाचा उद्देश देशातील संस्थांना वाचवण्याचा आहे. त्यांच्या दुरूपयोगाला अंकुश लावण्याचा आहे. राजकीय मतभेद असूनही आम्ही एक झालो आहोत. सगळ््या मुद्यांवर विस्ताराने चर्चा केली आहे. सगळ््या मुद्यांवर विस्ताराने चर्चा केली आहे. या बैठकीस समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाचे नेते मात्र उपस्थित नव्हते.

Web Title: 21 parties assembled against Modi government; First meeting in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.