गुजरातमध्ये पुतळ्यासाठी 2500 कोटी, तर अमरावतीला फक्त 1500 कोटी, चंद्राबाबूंचं मोदींवर टीकास्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 08:30 PM2018-04-30T20:30:07+5:302018-04-30T20:30:51+5:30

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्यासाठी मोदींनी 2500 कोटी दिले, तर आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीसाठी फक्त 1500 कोटींची तरतूद केली.

2,500 crores for the statue in Gujarat, and only 1500 crores for Amravati - Chandrababu Naidu | गुजरातमध्ये पुतळ्यासाठी 2500 कोटी, तर अमरावतीला फक्त 1500 कोटी, चंद्राबाबूंचं मोदींवर टीकास्र

गुजरातमध्ये पुतळ्यासाठी 2500 कोटी, तर अमरावतीला फक्त 1500 कोटी, चंद्राबाबूंचं मोदींवर टीकास्र

Next

तिरुपती- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्यासाठी मोदींनी 2500 कोटी दिले, तर आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीसाठी फक्त 1500 कोटींची तरतूद केली, असं चंद्राबाबू तिरुपती येथे म्हणाले आहेत. नरेंद्र मोदी लोकांना पोकळ आश्वासनं देतायत. मोदी जनतेला स्वर्ण आंध्र पाहिजे की स्कॅम आंध्र असं विचारत आहेत. तसेच स्वर्ण आंध्र हवा असल्यास भाजपाला मतदान करा, असं मोदी सांगत आहेत. परंतु आज त्यांनी एका भ्रष्टाचारी पक्षाबरोबर युती केली आहे, असं चंद्राबाबू म्हणाले आहेत. यावेळी चंद्राबाबू मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.




आंध्र प्रदेशातील लोकांनी भाजपाला या आधीच नाकारायला सुरुवात केली आहे, पण लवकरच एक दिवस असा येईल की, जेव्हा संपूर्ण देशच भाजपाला नाकारेल, असा दावा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व तेलगू देसमचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी केला होता. चंद्राबाबूंनी एनडीएचा पाठिंबा काढून घेतला असून, केंद्रातून त्यांचे दोन मंत्रीही बाहेर पडले आहेत. मोदींनी त्याला प्रत्युत्तर देत आंध्रच्या मंत्रिमंडळातून भाजपाच्या दोन मंत्र्यांना राजीनामा देण्यास लावले. चंद्राबाबूंनी खासदारांसमवेत एनडीएचा पाठिंबा काढून घेत मोदींना जबर हादरा दिला होता.

Web Title: 2,500 crores for the statue in Gujarat, and only 1500 crores for Amravati - Chandrababu Naidu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.