2 जी स्पेक्ट्रम घोटाळा : कनिमोळींच्या सुटकेमुळे आनंद, न्याय मिळाला - सुप्रिया सुळेंनी ट्विटवर व्यक्त केली भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 12:25 PM2017-12-21T12:25:10+5:302017-12-21T13:14:43+5:30
1 लाख 76 हजार कोटी रुपयांच्या 2G स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणातील माजी दूरसंचार मंत्री ए. राजा व कनिमोळी यांच्यासहीत सर्वा आरोपींची निर्दोष सुटका झाली आहे.
नवी दिल्ली - 1 लाख 76 हजार कोटी रुपयांच्या 2G स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणातील माजी दूरसंचार मंत्री ए. राजा व कनिमोळी यांच्यासहीत सर्वा आरोपींची निर्दोष सुटका झाली आहे. दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयानं हा निर्णय दिल्यानं काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कोर्टाच्या निर्णयावर आनंद व्यक्त करणारे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
'माझी मैत्रिणी कनिमोळी यांच्या सुटकेमुळे आनंद झाला आहे. न्याय मिळाला'', असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
2 जी स्पेक्ट्रम व्यवहारावर कॅगने आपल्या अहवालातून ताशेरे ओढल्यानंतर 2010 साली हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आला होता. पारदर्शक निविद प्रक्रियेशिवाय ए. राजा यांच्या दूरसंचार मंत्रालयाने 2 जी स्पेक्ट्रमच्या 122 परवान्यांचे वाटप केले होते. त्यामुळे सरकारी तिजोरीचे 1.76 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवला होता. 2 फेब्रुवारी 2012 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सर्व परवाने रद्द केले होते.
So happy for my friend kanni.. justice done🙏🏽🙏🏽🙏🏽😀 @KanimozhiDMKpic.twitter.com/NffxsIE1ww
— Supriya Sule (@supriya_sule) December 21, 2017
Visuals from Former Telecom Minister A Raja's residence in Delhi, he has been acquitted in the 2G Scam case. #2GScamVerdictpic.twitter.com/kfgyy5JahB
— ANI (@ANI) December 21, 2017
Congress leaders are treating this judgement as some kind of a badge of honor & a certification that it was an honest policy: Arun Jaitley #2GScamVerdictpic.twitter.com/Y6fWNXVW5t
— ANI (@ANI) December 21, 2017
#WATCH: Former PM Manmohan Singh says, 'the court judgement has to be respected. I'm glad that the court has pronounced that the massive propaganda against UPA was without any foundation.' #2GScamVerdictpic.twitter.com/9WAhwjekph
— ANI (@ANI) December 21, 2017
If the Government has concrete evidence, then they should take the matter to a higher court: Anna Hazare #2GScamVerdictpic.twitter.com/wkTmT9JJm3
— ANI (@ANI) December 21, 2017
कोण-कोण होते आरोप?
सीबीआयाकडून दाखल करण्यात आलेल्या पहिल्या खटल्यात ए. राजा, कनिमोळी यांच्याव्यतिरिक्त माजी दूरसंचार सचिव सिद्धार्थ बेहुरा, राजा यांचे खासगी सचिव आर के चंदोलिया, शाहिद उस्मान बलवा आणि विनोद गोयनका, यूनीटेक लिमिटेड एमडी संजय चंद्रा आणि अनिल धीरूभाई अंबानी समूहतील तीन कार्यकारी अधिकारी गौतम दोशी, सुरेंद्र पिपारा आणि हरि नायर हे आरोपी होते.
2011 मध्ये या घोटाळ्याची दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरू झाली होती. या प्रकरणात न्यायालयाने ए राजा, कनिमोळी यांच्यासह १७ जणांवर आरोप निश्चित करण्यात आले होते. गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे, सरकारी पदाचा गैरवापर करणे, लाच घेणे अशा विविध कलमांखाली त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले होते.
काय आहे नेमके प्रकरण?
संपुआ सरकारच्या काळात झालेल्या या स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्यात देशाच्या तिजोरीचे १ लाख ७६ हजार कोटीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले होते. तत्कालीन विरोधी पक्ष भाजपाने यामुळे सरकारविरोधात केवळ संसदेतच नव्हे तर सर्व देशात सरकारविरोधात आंदोलने आणि विरोध प्रदर्शन केले होते. द्रमुक पक्षाचीही या महाघोटाळ्यामुळे मोठी नाचक्की झाली होती.
महालेखापरिक्षकांनी या घोटाळ्यात सरकारी तिजोरीचे १ लाख ७६ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे तेव्हा स्पष्ट केले असले तरी सीबीआयने मात्र या घोटाळ्यात केवळ ३० हजार कोटींचे नुकसान झाल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत बोलताना सीबीआयचे माजी संचालक ए. पी.सिंग म्हणाले, या घोटाळ्याचा तपास करताना आमच्यावर सर्व बाजूंनी आमच्यावर दबाव होता, तत्कालीन सरकारने या स्पेक्ट्रम वाटपात काहीच नुकसान झाले नाही ( झिरो लाँस) अशी भूमिका घेतली होती. मात्र आमच्या गणनानुसार यात ३०, हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट केले. सीबीआयला पिंज-यातला पोपट म्हणणे योग्य नाही कारण याच काळात आम्ही इतर राजकीय नेत्यांवरील खटले व तपास यशस्वीरित्या पूर्ण केला होता.