श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सोमवारी सुरक्षादलांसोबत झालेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले, असे संरक्षण प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी म्हटले. दक्षिण काश्मीर जिल्ह्याच्या काझीगुंड भागातील लोअर मुंडा येथे गस्तीवरील सुरक्षादल पथकावर अतिरेक्यांनी गोळीबार केला. त्याला पथकाने प्रतिउत्तर दिल्यावर चकमक उडाली. त्यात तीन अतिरेकी मारले गेले.कालिया म्हणाले की, ‘‘लोअर मुंडा येथे झालेल्या संयुक्त कारवाईत तीन दहशतवादी मारले गेले.’’ ही चकमक झाली तेथेच झालेल्या स्फोटात पाच नागरिक जखमी झाले. जखमी झालेले लोक तेथे एकत्र जमले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. सुरक्षादले आणि अतिरेकी यांच्यात झालेल्या चकमकीत हा बॉम्ब मागे राहिला होता.>पाकडून उल्लंघनपाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरच्या उरी क्षेत्रात (जिल्हा बारामुल्ला) नियंत्रण रेषेवर सोमवारी कोणतेही कारण नसताना गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, असे अधिकाºयाने सांगितले. पाकिस्तान लष्कराने सिलिकोट, चुरुंदा आणि तिलावारी येथे छोट्या आणि मोठ्या शस्त्रांतून भारतीय ठिकाणांना लक्ष्य केले. शस्त्रसंधी उल्लंघनामुळे जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
कुलगामामध्ये चकमकीत ३ अतिरेकी ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 4:09 AM