शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

नितीश सरकारमध्ये यादवांचा दबदबा; ३१ नव्या मंत्र्यांचा समावेश; गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 5:59 AM

Nitish Kumar-led Bihar govt : हा शपथविधी सोहळा ५२ मिनिटे चालला. एकाचवेळी ५ - ५ मंत्र्यांना शपथ देण्यात आली. यात राजदचे १६, जदयूचे ११, काँग्रेसचे २, हमचा एक सदस्य आणि एका अपक्ष सदस्याचा समावेश आहे.

- एस. पी. सिन्हा

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वातील महाआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार करण्यात आला. जदयू, राजद, काँग्रेस आणि हिंदुस्थान आवाम मोर्चाच्या (हम) ३१ आमदार आणि विधान परिषद सदस्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल फागू चौहान यांनी या सदस्यांना शपथ दिली. 

हा शपथविधी सोहळा ५२ मिनिटे चालला. एकाचवेळी ५ - ५ मंत्र्यांना शपथ देण्यात आली. यात राजदचे १६, जदयूचे ११, काँग्रेसचे २, हमचा एक सदस्य आणि एका अपक्ष सदस्याचा समावेश आहे. नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना विभागांचे वाटपही करण्यात आले आहे. नितीशकुमार यांच्याकडे सामान्य प्रशासन, गृह, मंत्रिमंडळ सचिवालय आणि इतर कुणालाही न दिलेली खाती आहेत. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याकडे आरोग्य, रस्ते निर्मिती, नगरविकास व निवास तसेच ग्रामीण विकास ही महत्त्वाची खाती सोपविण्यात आली आहेत. 

यादव समुदायाच्या ८ जणांना मंत्रिपद  बिहारमधील नव्या मंत्रिमंडळात ८ यादव सदस्यांना संधी देण्यात आली आहे. राजदकडून ७ आणि जदयूकडून एक मंत्री हे यादव आहेत. गत मंत्रिमंडळात या समुदायाचे केवळ दोन मंत्री होते. विधानसभा अध्यक्षपदासाठीही यादव चेहराच निवडण्यात आला आहे. कुर्मी समुदायाचे एक मंत्री असून, दलित समुदायाचे सहा मंत्री आहेत. सवर्ण समुदायातून सर्वाधिक तीन राजपूत समुदायाचे मंत्री आहेत. ब्राह्मण समुदायातील एक मंत्री आहेत. 

शाहनवाज आलम यांना दिले मंत्रिपद एमआयएममध्ये फूट पाडून राजदला मजबूत करणारे माजी मंत्री दिवंगत तस्लीमुद्दिन यांचे चिरंजीव शाहनवाज आलम यांना राजदमधून मंत्रिपद देण्यात आले आहे. अररिया जिल्ह्यातील जोकीहाटमधून शाहनवाज आलम हे २०२०मध्ये दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. गत महिन्यात एमआयएमच्या चार आमदारांना राजदमध्ये सहभागी करुन घेण्यात शाहनवाज यांची मोठी भूमिका राहिलेली आहे. 

राजदचे मंत्रीतेज प्रताप यादव - वन, पर्यावरण; अलोक मेहता - महसूल व भूमी सुधार; अनिता देवी - मागास वर्ग कल्याण; सुरेंद्र यादव - सहकार; चंद्रशेखर : शिक्षण; ललित यादव - सार्वजनिक आरोग्य; जितेंद्र राय - कला, संस्कृती व युवा; रामानंद यादव - खान; सुधाकर सिंह - कृषी; सर्वजीत कुमार - पर्यटन; सुरेंद्र राम - कामगार; शमीम अहमद - साखर उद्योग; शहनवाज - आपत्कालीन व्यवस्थापन; इसरायल मन्सुरी - माहिती व तंत्रज्ञान; कार्तिक सिंह - विधी; समीर महासेठ - उद्योग.

जदयूचे मंत्री विजय चौधरी - अर्थ, वाणिज्य व संसदीय कार्य; बिजेंद्र यादव - ऊर्जा; अशोक चौधरी - बांधकाम; श्रवण कुमार - ग्रामीण विकास; संजय झा - जल संसाधन, माहिती व जनसंपर्क; मदन सहनी - समाजकल्याण; शीला कुमारी - परिवहन; लेशी सिंह - अन्न व ग्राहक संरक्षण; जमा खान - अल्पसंख्याक कल्याण; जयंत राज - जलसिंचन; सुनील कुमार - नोंदणी. 

काँग्रेसचे मंत्री मुरारी प्रसाद गौतम - पंचायत राज; अफाक आलम - पशु व मत्स्य संसाधन

हिंदुस्थान अवाम मोर्चा संतोष कुमार सुमन - अनुसूचित जाती व जनजाती कल्याण.अपक्ष : सुमितकुमार सिंह - विज्ञान व तंत्रज्ञान 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादवBiharबिहार