Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवलं अन् पाकमध्ये शेअर बाजार गडगडला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 03:55 PM2019-08-05T15:55:16+5:302019-08-05T16:00:45+5:30

Article 370 Impact: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 संपुष्टात आणलं आहे.

370 clauses were removed from Jammu and Kashmir and the stock market in Pakistan plummeted | Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवलं अन् पाकमध्ये शेअर बाजार गडगडला

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवलं अन् पाकमध्ये शेअर बाजार गडगडला

Next

नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 जवळपास संपुष्टात आणलं आहे. त्यानंतर पाकिस्तानमध्येशेअर बाजार गडगडला आहे. पाकिस्तानचाशेअर बाजारचा बेंचमार्क इंडेक्स KSE100 हा 600 अंकांनी कोसळला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याची शिफारस केली आहे. तसेच जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेचं विधेयकही मांडलं होतं. ज्यात लडाखला जम्मू-काश्मीरमधून वेगळं करून केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे.

पाकिस्तानचा शेअर बाजारात उघडल्यावरच कोसळला. केएसई100 चा 31666.41 अंकांवर उघडला. परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी कलम 370 हटवण्याची शिफारस केली आणि राष्ट्रपतींनी लागलीच त्याला मंजुरी दिली. त्यानंतर पाकिस्तानच्या शेअर बाजारात एकच खळबळ माजली. त्यानंतर काश्मीरचा शेअर बाजार 687.45 अंकांनी कोसळून 30,978.96 स्तरावर खाली आला. जो दिवसभरातील नीचांक होता.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानचा शेअर बाजार गेल्या दोन वर्षांत जगातील सर्वात खराब कामगिरी करणारा शेअर बाजार म्हणून समोर आला आहे. गुंतवणूकदारांचे जवळपास 6,88,000 कोटी रुपये पाकिस्तान शेअर बाजारात बुडाले आहेत. पंतप्रधान इम्रान खान सत्तेवर आल्यानंतर जवळपास वर्षभरातच जनतेच्या रागाचा पाकिस्तानला सामना करावा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये आर्थिक संकटही वाढत आहे. पाकिस्तानमध्ये गरजेच्या वस्तूंचे दरही वेगानं गगनाला भिडत आहेत. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानचा रुपया 30 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. त्याचा परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. 

Web Title: 370 clauses were removed from Jammu and Kashmir and the stock market in Pakistan plummeted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.