काश्मिरात 4 घुसखोरांचा खात्मा
By admin | Published: November 27, 2014 11:50 PM2014-11-27T23:50:21+5:302014-11-27T23:50:21+5:30
भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरील अर्निया भागात गुरुवारी घुसखोरी करून आलेल्या सैन्य गणवेशातील सशस्त्र दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन खंदकांवर भीषण हल्ला केला.
Next
घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला : चकमकीत तीन जवान शहीद
जम्मू/नवी दिल्ली : भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरील अर्निया भागात गुरुवारी घुसखोरी करून आलेल्या सैन्य गणवेशातील सशस्त्र दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन खंदकांवर भीषण हल्ला केला. जवान व दहशतवाद्यांत उडालेल्या चकमकीत 3 जवान शहीद झाले, तर जवानांनी चारही दहशतवाद्यांचा खात्मा केला. यावेळी तीन नागरिकही मारले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी विधानसभा प्रचारासाठी जम्मू भागात येत असतानाच दहशतवाद्यांनी रक्तपात घडवून आणल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सावध झाली आहे.
लष्कराच्या खंदकांवर हल्ला केल्यानंतर चारही दहशतवादी तेथेच अडकून पडले. त्यानंतर जवानांनी त्यांना गोळ्या घातल्या. या खंदकात आणखी एक दहशतवादी लपून बसला असण्याची शक्यता लक्षात घेऊन खंदक नष्ट करण्यासाठी रणगाडा तैनात करण्यात आल्याची माहिती लष्करी अधिका:याने दिली.
या दहशतवाद्यांनी 92 इन्फन्ट्री ब्रिगेडच्या पिंडी खत्तार येथील दोन रिक्त खंदकांचा ताबा घेतला होता.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
ही माहिती मिळाल्यानंतर जवानांनी तेथे कारवाई सुरू केली. त्यावेळी खंदकात दडून बसलेले दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये जोरदार चकमक झडली. दहशतवाद्यांनी वापरलेली कार जवानांनी जप्त केली. दरम्यान अन्य एका घटनेत राजाैरी जिलत नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) जवानांनी अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला.
4पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ सार्क परिषदेत सहभागी होण्याशी अतिरेकी हल्ल्याचा काहीही संबंध नसल्याचे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले.
4चकमकीत शहीद झालेल्या तीन जवानांच्या कुटुंबियांप्रती मी संवदेना व्यक्त करतो, असे ओमर अब्दुल्ला यांनी टि¦टरवर म्हटले.