'न्याय मंदिरात ४० चप्पलचोरांना थारा नाही'; न्यायाधीशांच्या 'त्या' विधानाचा शिवसेनेला आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 08:23 AM2023-03-02T08:23:38+5:302023-03-02T08:24:18+5:30

सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, एका आलिशान कारमधून लहान रोपटं असलेल्या कुंड्या चोरून नेल्या जात आहेत

'40 shoe thieves have no luck in Naya Mandir'; Shiv Sena's support for that judge's statement | 'न्याय मंदिरात ४० चप्पलचोरांना थारा नाही'; न्यायाधीशांच्या 'त्या' विधानाचा शिवसेनेला आधार

'न्याय मंदिरात ४० चप्पलचोरांना थारा नाही'; न्यायाधीशांच्या 'त्या' विधानाचा शिवसेनेला आधार

googlenewsNext

नवी दिल्ली/मुंबई - निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे नेते चांगलेच संतप्त झाले आहेत. उद्धव ठाकरेंनी वारंवार शिंदे गटाला चोर असं म्हटलंय.  बाप चोरणारी टोळी असा उल्लेख करत शिंदे गटावर निशाणा साधण्यात आलाय. आता, पुन्हा एकदा सामना या मुखपत्रातून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. रस्त्यांवरील 'कुंड्या' आलिशान गाडीत चोरून न्याव्यात त्याप्रमाणे निवडणूक आयोगाबाहेर दिमाखदार गाड्या लावून त्यांनी धनुष्यबाण व शिवसेना चोरून नेली, असे शिवसेनेनं म्हटलंय.  

सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, एका आलिशान कारमधून लहान रोपटं असलेल्या कुंड्या चोरून नेल्या जात आहेत. त्याच व्हिडिओचा आधार घेत शिवसेनेनं शिंदे गटावर प्रहार केलाय. रस्त्यांवरील 'कुंड्या' आलिशान गाडीत चोरून न्याव्यात त्याप्रमाणे निवडणूक आयोगाबाहेर दिमाखदार गाड्या लावून त्यांनी धनुष्यबाण व शिवसेना चोरून नेली. देशात भाजपचे राज्य असल्यानेच श्रीमंतांना रस्त्यांवरील कुंड्या चोरण्याची विकृती निर्माण झाली , पण हे रस्त्यावरील कुंडीचोर म्हणजे खरी शिवसेना नव्हे . असूच शकत नाही . खरी शिवसेना विधिमंडळ , संसदेच्या बाहेर आहे, असेही शिवसेनेनं म्हटलंय. 

आम्ही शब्दावरील आक्षेप महत्त्वाचा

घर म्हणजे नक्की काय असतं यावर अनेकांनी अनेक भावना व्यक्त केल्या आहेत. घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत. त्या भिंतीत सजवलेल्या टेबल-खुर्च्यादेखील नाहीत. घर म्हणजे घरातली माणसं. त्या माणसांतला जिव्हाळा, प्रेम, ममत्व, कुटुंब म्हणजे घर. अशी घरे जेव्हा स्वार्थासाठी तोडली जातात तेव्हा कुटुंब व्यवस्थेला तडे जातात. नात्यांवरील विश्वास नाहीसा होतो. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी 'शिवसेना' या कुटुंबाविषयी अप्रत्यक्षपणे तीच भावना व्यक्त केल्याचे दिसते.  महाराष्ट्रातील तथाकथित सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मिंधे गटाचे वकील सांगत आहेत, ''आम्ही म्हणजेच शिवसेना!'' या 'आम्ही'वर न्या. चंद्रचूड यांनी घेतलेला आक्षेप महत्त्वाचा आहे, असे शिवसेनेनं म्हटलंय. 

न्याय मंदिरात चप्पलचोरांना थारा नाही

''विधिमंडळात तुमच्याकडे बहुमत आहे याचा अर्थ तुम्ही म्हणजे पक्ष होत नाही.'' न्या. चंद्रचूड यांनी नेमके विधान केले आहे. विधिमंडळातील फक्त चाळीस आमदार म्हणजेच शिवसेना, असा निर्णय निवडणूक आयोगातील ईस्ट इंडिया कंपनीच्या एजंटांनी दिला काय आणि या विकतच्या बहुमतवाल्यांनी नाचायलाच सुरुवात केली, पण कितीही नाचकाम केले तरी सर्वोच्च न्यायालयात न्यायासाठी सुनावणी सुरू आहे व न्याय मेला नाही हे लवकरच कळेल. महाशक्तीने निवडणूक आयोग खिशात घातला, पण सर्वोच्च न्यायालय हे मंदिर आहे. त्या मंदिरात चाळीस चप्पलचोरांना थारा नाही.

श्रीमंतांनी कुंड्या चोरल्या

हरयाणातील गुरगाव येथे एक अतिश्रीमंत माणूस आपल्या कोटय़वधीच्या आलिशान गाडीत रस्त्यांवरील सरकारी कुंड्या घालून निघून गेला. सध्या 'G-20' नामक जो काही आंतरराष्ट्रीय उत्सव आपल्या देशात सुरू आहे, त्या जागतिक प्रतिनिधींना आमचा देश सुंदर वाटावा, रस्त्यांच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून या कुंड्या झाडांसह रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आल्या. त्या कुंड्या एका श्रीमंताने दिवसाढवळय़ा चोरून त्याच्या घराची शोभा वाढवली. अगदी असलाच प्रकार उत्तर प्रदेशातील लखनौलादेखील घडला. लखनौच्या रस्त्यांवरून कोटय़वधीच्या कुंड्या झाडांसह चोरण्यात आल्या व त्याचा व्हिडीओदेखील समोर आला. दोन्ही राज्यांत भाजपचीच संस्कारक्षम राज्ये आहेत. कुंड्या जनतेसाठी होत्या. त्या भाजपच्या राज्यात श्रीमंतांनी चोरल्या. शिवसेना व धनुष्यबाणाच्या बाबतीत नेमके हेच घडले.
 

Web Title: '40 shoe thieves have no luck in Naya Mandir'; Shiv Sena's support for that judge's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.