जम्मू-काश्मीरमधील पूँछ, राजौरी जिल्ह्यात 400 अतिरिक्त बंकर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 07:41 AM2019-03-03T07:41:52+5:302019-03-03T08:23:11+5:30

जम्मू-काश्मीरमधील प्रशासनाने पूँछ आणि राजौरी जिल्ह्यात अतिरिक्त बंकर उभारण्यास परवानगी दिली आहे.

400 additional bunkers will be built in poonch and rajouri districts due to stress on border | जम्मू-काश्मीरमधील पूँछ, राजौरी जिल्ह्यात 400 अतिरिक्त बंकर

जम्मू-काश्मीरमधील पूँछ, राजौरी जिल्ह्यात 400 अतिरिक्त बंकर

googlenewsNext
ठळक मुद्देपुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे.जम्मू-काश्मीरमधील पूँछ, राजौरी जिल्ह्यात 400 अतिरिक्त बंकर उभारण्यात येणार आहेत.मेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे.

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील प्रशासनाने पूँछ आणि राजौरी जिल्ह्यात अतिरिक्त बंकर उभारण्यास परवानगी दिली आहे.

पूँछ आणि राजौरी जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर गोळीबार करण्यात येत आहे.  या दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 200 बंकर बांधण्यात येणार आहेत. यामुळे पाकिस्तानकडून ज्यावेळी गोळीबार करण्यात येईल, त्यावेळी येथील स्थानिक नागरिकांना त्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी या बंकरचा मोठा उपयोग होणार आहे. 


दरम्यान, ग्रामविकास विभागाच्या उपायुक्तांकडे या बंकर उभारणीसाठी लागणारा निधी सुपूर्द करण्यात येणार आहे. हे बंकर लवकरात लवकर बांधण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.  तसेच, येत्या महिनाभरात दोन्ही जिल्ह्यातील 400 बंकर बांधून तयार होतील, अशी माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली आहे. 
 

Web Title: 400 additional bunkers will be built in poonch and rajouri districts due to stress on border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.