आंध्र प्रदेश : श्रीरामाची ४०० वर्ष जुनी मूर्ती अज्ञातांनी तोडली; भाजपा म्हणतं, "हे १६ व्या शतकातल्या..."
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 02:18 PM2020-12-31T14:18:15+5:302020-12-31T14:21:03+5:30
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील विजयनगरम परिसरात प्रभू श्रीरामाची ४०० वर्ष जुनी मूर्ती अज्ञातांनी तोडल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर विरोधकांनी जगनमोहन रेड्डी सरकारवर जोरदार टीका केली.
आंध्र प्रदेशातील विजयनगरम परिसरात प्रभू श्रीरामाची ४०० वर्ष जुनी मूर्ती अज्ञातांनी तोडल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर विरोधकांनी जगनमोहन रेड्डी सरकारवर जोरदार टीका केली. तसंच भाजपा नेते सुनील देवधर यांनी आंध्र प्रदेशात हिंदू मंदिरांवर होत असलेले हल्ले हे १६ व्या शतकातील गोव्यातील क्रूर सेंट झेविअरच्या हल्ल्यांची आठवण करून देत असल्याचं म्हटलं.
"आंध्र प्रदेशात हिंदू मंदिरांवर सतत होत असलेल्या हल्ल्यांवरून तालिबानकडून बामियान येथे तोडण्यात आलेल्या बुद्धाच्या प्रतीमेती आठवण झाली. ही घटना अतिशय भयावह आहे. मंदिरांवरील हल्ल्यांवर जगनमोहन रेड्डी सरकारचं मौन हे त्यांचं समर्थन दाखवत आहे," असा आरोपही सुनील देवधर यांनी केला. "एकीकडे अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यात येत आहे आणि तर दुसरीकडे या ठिकाणी रामाची मूर्ती तोडण्यात आली," असं मत जनसेना प्रमुख आणि चित्रपटसृष्टीतून राजकारणात प्रवेश केलेल्या पवन कल्याण यांनी व्यक्त केलं. या घटनेनंतर विरोधकांनी जगनमोहन रेड्डी यांच्यावर निशाणा साधला आहे.
Thread-
— Sunil Deodhar (@Sunil_Deodhar) December 30, 2020
Repeat attacks on Hindu temples in Andhra Pradesh are reminiscent of actions of 16th century ruthless St. Xavier in Goa who destroyed temples & carried out forced conversions & Taliban's destruction of giant Buddha statues in Bamiyan.
Join me & #CondemBeheadingLordRamIdolpic.twitter.com/hbeRhv17Qi
"त्यांनी ऐतिहासिक मंदिरात चुकीचं कृत्य केलं आहे. राज्य सरकारनं पीथमपूर, कोंडा बिटरगुन्टा आणि अंटहेरवेदी या ठिकाणी घडलेल्या घटनांवर गंभीररित्या कोणतीही कारवाई केली नाही. अंतरावेदीमध्ये श्री लक्ष्मी नरसिम्हा स्वामी मंदिराचा रत जाळणाऱ्या आरोपींचा अजून शोध घेता आलेला नाही. ना या प्रकरणी कोणाला अटक करण्यात आली आहे. हिंदूंचे देवीदेवता आणि मंदिरातील मूर्तींवर होणाऱ्या या हल्ल्यांना काय म्हटलं पाहिजे?, हो कोणीही वेडेपणानं केलेलं कृत्य नाही तर धार्मिक संतुलन गमावलेल्या लोकांनी केलेलं आहे," असंही पवन कल्याण म्हणाले.
दरम्यान, पवन कल्याण यांनी अशा घटनांवर गृहमंत्रालयानंही लक्ष द्यावं, अशी विनंती केली आहे. "दीड वर्षांपासून मंदिरं आणि मूर्त्यांवर अशाप्रकारचे हल्ले होत आहेचय मंदिरांवर होणाऱ्या या हल्ल्यांची सीबीआयद्वारे चौकशीही करण्यात यावी," अशी मागणीही त्यांनी केली. तर दुसरीकडे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीदेखील या घटनेचा निषेध केला. तसंच या घटनेसाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोपही केला.