"देशात एकूण 42 मेगा फूड पार्क मंजूर"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 09:40 PM2017-07-21T21:40:08+5:302017-07-21T21:40:08+5:30
देशामध्ये एकूण 42 मेगा फुड पार्क मंजूर करण्यात आले असून त्यापैकी नऊ प्रकल्प कार्यान्वित झाले आहे...
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - देशामध्ये एकूण 42 मेगा फुड पार्क मंजूर करण्यात आले असून त्यापैकी नऊ प्रकल्प कार्यान्वित झाले आहे. तर 33 प्रकल्प प्रगतीपथावर आहेत अशी माहिती केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसीमरत कौर बादल यांनी दिली. मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात हरसीमरत कौर बादल यांनी याबाबत माहिती दिली.
केंद्रीय मंत्री कौर म्हणाल्या की, आपला देश अन्न धान्य आणि दूध उत्पादनात जागतिक स्तरावर अग्रेसर आहे. देशात सुमारे एक लाख कोटी रुपयांचे अन्न वाया जाते. ही खेदाची बाब असून अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून अन्न वाया जाण्याचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यामुळे गरजू आणि भुकलेल्यांना अन्न मिळेल असं त्या म्हणाल्या.
देशामध्ये एकूण 42 मेगा फुड पार्क मंजूर करण्यात आले असून त्यापैकी नऊ प्रकल्प कार्यान्वित झाले आहे. तर 33 प्रकल्प प्रगतीपथावर आहे. पुढील दोन वर्षांत शीतसाखळी प्रयोगाचे 100 प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून किसान संपदा योजना तयार करण्यात आली आहे. त्यासाठी सहा हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात 23 शीतगृहे आणि तीन मेगा फुड पार्क मंजूर करण्यात आल्याचे श्रीमती कौर यांनी यावेळी सांगितले. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या जागतिकस्तरावरील अन्न प्रक्रिया उद्योग प्रदर्शनात राज्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
केंद्रीय अन्न प्रक्रिया विभागामार्फत नवी दिल्ली येथे 3 ते 5 नोव्हेंबर 2017 दरम्यान वर्ल्ड फूड इंडिया 2017चे आयोजन करण्यात आले आहे. या जागतिकस्तरावरील प्रदर्शनामध्ये राज्यांनी सहभागी व्हावे यासाठी या क्षेत्रातील गुंतवणूकदारांना माहिती देण्याकरिता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याची सुरुवात महाराष्ट्रापासून करत येथील हॉटेल ताज विवांतमध्ये या उपक्रमासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रिय अन्न प्रक्रिया मंत्री हरसीमरत कौर बादल, राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, केंद्रिय अन्न प्रक्रिया विभागाचे सचिव जगदिशप्रसाद मिना, राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, सीआयआयच्या अध्यक्ष शोभना कामियनी आदी यावेळी उपस्थित होते.