४५ एनआरआयचे पासपोर्ट केले रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 05:58 AM2019-03-05T05:58:52+5:302019-03-05T05:59:00+5:30
पत्नीला सोडून दिलेल्या ४५ अनिवासी भारतीयांचे (एनआरआय) पासपार्ट सरकारने रद्द केले आहेत, असे महिला व बाल विकासमंत्री मनेका गांधी यांनी म्हटले.
नवी दिल्ली : पत्नीला सोडून दिलेल्या ४५ अनिवासी भारतीयांचे (एनआरआय) पासपार्ट सरकारने रद्द केले आहेत, असे महिला व बाल विकासमंत्री मनेका गांधी यांनी म्हटले.
अनिवासी भारतीयांच्या विवाहांवर लक्ष देण्यासाठी करण्यात आलेली इंटेग्रेटेड नोडल एजन्सी अनिवासींच्या लग्नांतील फरार पतींना लुकआऊट परिपत्रक जारी करीत आहे व परराष्ट्र मंत्रालयाने ४५ पासपोर्ट रद्द केले आहेत, असे मनेका गांधी म्हणाल्या. महिला व बाल विकास मंत्रालयातील सचिव राकेश श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली नोडल एजन्सीची बैठक झाली. मनेका गांधी म्हणाल्या की, अनिवासी भारतीयांनी सोडून दिलेल्या पत्नींना न्याय मिळण्यासाठी सरकारने राज्यसभेत विधेयक मांडले होते. परंतु खेद याचा की हे विधेयक वरिष्ठ सभागृहात अडवून ठेवले गेले आहे.