कोलकाता: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकारण तापू लागलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला पराभूत करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं कंबर कसली आहे. ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय मानले जाणारे तृणमूलचे दिग्गज नेते शुभेंदू अधिकारी भाजपमध्ये सामील होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच आता भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी तृणमूलचे वरिष्ठ खासदार सौगत रॉय यांच्यासह ५ खासदार कधीही राजीनामा देऊन भाजपमध्ये येतील, असा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.पश्चिम बंगालमधल्या डमडमचे खासदार सौगत रॉय यांच्यासह ५ लोकसभा सदस्य लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा अर्जुन सिंह यांनी केला आहे. सिंह भाजपचे प्रदेशाध्यक्ष असून ते लोकसभेत बॅरकपूर मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. सौगत रॉय तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळात ते मंत्री होते. ते चौथ्यांदा खासदार असून त्याआधी त्यांनी ५ वेळा विधानसभेची निवडणूक जिंकली आहे.
त्यांचे पाच खासदार कधीही राजीनामा देऊ शकतात; भाजप नेत्याच्या दाव्यानं खळबळ
By कुणाल गवाणकर | Published: November 21, 2020 7:02 PM