H1N1चा SCच्या 6 न्यायमूर्तींना संसर्ग; मास्क घालून पोहोचले न्यायालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 03:34 PM2020-02-25T15:34:38+5:302020-02-25T15:38:53+5:30
सरन्यायाधीशांनी न्यायमूर्तींबरोबर एक बैठक घेतली असून, न्यायालयातील कर्मचाऱ्यांचं या संक्रमणापासून रोखण्यासाठी लसीकरण केलं जाणार आहे.
नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयाच्या सहा न्यायमूर्तींना एच1एन1चं संक्रमण झालं आहे, अशी माहिती न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी दिली आहे. सरन्यायाधीश एस. एस. बोबडे यांनीसुद्धा उद्भवलेल्या आपत्कालीन स्थितीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या कोर्ट नंबर दोनमध्ये न्यायमूर्ती संजीव खन्ना सुनावणी करताना मास्क घातलेले पाहायला मिळाले. त्यानंतर सरन्यायाधीशांनी न्यायमूर्तींबरोबर एक बैठक घेतली असून, न्यायालयातील कर्मचाऱ्यांचं या संक्रमणापासून रोखण्यासाठी लसीकरण केलं जाणार आहे.
न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी न्यायालयाच्या कक्षेत वकिलांना संबंधित बैठकीची माहिती दिली आहे. बैठकीत सरन्यायाधीशांनी न्यायालयातील कर्मचारी आणि वकिलांना एच1एन1च्या लसीकरणाची सेवा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर सरन्यायाधीशांनी बार काऊन्सिलच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना ही माहिती दिली आहे.
In Court Room Number-2 in the Supreme Court today, Justice Sanjiv Khanna was seen wearing a mask, during a hearing. https://t.co/cxtoUSyf23
— ANI (@ANI) February 25, 2020
कसा होतो (H1N1)स्वाइन फ्लू?
ताप, सर्दी, घशात खवखव होणे, अंगदुखी ही स्वाइन फ्लूची लक्षणं आहेत. बऱ्याचदा उलटी आणि जुलाबसुद्धा होतात. स्वाइन फ्लू सौम्य आजार असला तरी तो गंभीर स्वरूप धारण करू शकतो. स्वाइन फ्लूला टॅमिफ्लू नावानंही ओळखलं जातं. त्यावर औषधही उपलब्ध आहे. स्वाइन फ्लूवर उपचार करण्यासाठी आधी त्या आजाराचं निदान होणं आवश्यक आहे.