तिरंंगी ध्वजाची ७२ वर्षांची अविरत प्रेरणा गाथा; संस्कृती, एकात्मभाव आणि गती-प्रगतीचा मिलाफ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 01:39 AM2020-07-23T01:39:37+5:302020-07-23T01:39:43+5:30
भारताची अस्मिता
नवी दिल्ली : ब्रिटीशांविरोधातील लढत अनेकांच्या आहुतीनंतर मिळालेल्या स्वातंत्र्याचे प्रतीक ठरलेल्या तिरंग्यास भारताचा अधिकृत राष्ट्रध्वज म्हणून २२ जुलै १९४७ साली स्वीकारण्यात आले. महिनाभराच्या अविरत चर्च$ेनंतर घटनासमितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. भारतीय संस्कृती, एकात्मभाव, गती-प्रगतीचा मिलाफ या ध्वजात आहे. राष्ट्रध्वज भारताची अस्मिता आहे.
आज भारताची ओळख असलेल्या तिंरग्याची कल्पना १९२१ पासून सुरू झाली. महात्मा गांधींनी १९२१ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रससाठी एक ध्वज सुचवला. पिंगली व्यंकय्या यांनी त्यांचे डिझाईन तयार केले होते. महात्मा गांधींनी १९२१ च्या एप्रिलमध्ये ‘यंग इंडिया’त लिहिलेल्या एका लेखात राष्ट्रध्वजाची संकलप्ना मांडली होती. गांधीजींच्या कल्पनेतील (काँग्रेसचा) ध्वज पहिल्यांदा १९२३ साली नागपूरमध्येच फडकवण्यात आल्याची नोंद आहे. काँग्रेसच्या ध्वजास स्वराज ध्वज संबोधण्यात आले होते.
अशोकचक्र अविरत श्रमाचे प्रतीक
१९५४ पर्यंत खादी ग्रामोद्योगास तिरंगा बनवण्याची परवानगी होती. त्यानंतर खासगी व्यावसायिकांनादेखील तशी परवानगी देण्यात आली. मात्र भारतीय मानक संस्थानाकडून मान्यता असणे गरजेचे आहे.
भगवा रंग शौर्य व बलिदान, पांढरा रंग सत्य-शांती तर हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र जे अविरत श्रमाचे प्रतीक तर निळा रंग विशालतेचे प्रतीक मानले जातो.भगवा रंग शौर्य व बलिदान, पांढरा रंग सत्य-शांती तर हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र जे अविरत श्रमाचे प्रतीक तर निळा रंग विशालतेचे प्रतीक मानले जातो.