७५ टक्के रुग्णांची कोरोनावर मात; सक्रिय २३ टक्केच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 06:34 AM2020-08-22T06:34:57+5:302020-08-22T06:35:08+5:30
६ लाख ९२ हजार २८ रुग्णांवर (२३.८%) विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नवी दिल्ली : देशातील कोरोनामुक्तीचा दर सातत्याने वाढत आहे. जवळपास ७५ टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, भारतात सध्य:स्थितीत २३.८ टक्के कोरोनारुग्ण आहेत.
शुक्रवारी देशात ६८ हजार ८९८ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली. ९८३ रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारी उच्चांकी ६२ हजार २८२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे अहवाल प्राप्त झालेत. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २९ लाख ५ हजार ८२३ एवढी झाली असली, तरी यातील २१ लाख ५८ हजार ९४६ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. ६ लाख ९२ हजार २८ रुग्णांवर (२३.८%) विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. देशात आतापर्यंत ५४ हजार ८४९ रुग्णांचा (१.९०%) कोरोनाने बळी घेतला आहे. सर्वाधिक कोरोनाप्रभावित महाराष्ट्रात गेल्या एका दिवसात उच्चांकी १४ हजार ६४७ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली.
> लॉकडाऊन-अनलॉक सक्रिय रुग्ण कोरोनामुक्त
१) लॉकडाऊन-३ (४ मे) २९,४५३ ११,७०७
२) लॉकडाऊन-४ (१८ मे) ५५,९०६ ३६,८२४
३) अनलॉक-१ (१ जुन) ८७,६९२ ९१,८१९
४)अनलॉक-२ (२० आॅगस्ट) ६,९२,०२८ २१,५८,९४६