देवेंद्र फडणवीसांनी घेतल्या देशभर ९१ प्रचारसभा; योगी आदित्यनाथ पहिल्या स्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 12:37 AM2019-05-18T00:37:11+5:302019-05-18T00:41:59+5:30
लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी ज्यांना सर्वाधिक मागणी होती त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सगळ्यत मोठे स्टार प्रचारक ठरले.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी ज्यांना सर्वाधिक मागणी होती त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सगळ्यत मोठे स्टार प्रचारक ठरले. दुसऱ्या स्थानी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिसºया क्रमांकावर होते.
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी येथे ही माहिती दिली. ते म्हणाले की, राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनी देशभर जवळपास १,३०० प्रचारसभा घेतल्या. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा प्रभाव असलेल्या सगळ्या ठिकाणी त्यांच्या सभा आम्ही आयोजित केल्या. त्याचा पक्षाला निश्चितच लाभ होईल.
योगी आदित्यनाथ यांनी देशभरात १३५ सभा घेतल्या, तर जयराम ठाकूर यांनी १०६ आणि फडणवीस यांनी ९१. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी देशात ८६ आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी ५८ सभा घेतल्या.
आदित्यनाथ यांना त्यांच्या जोशपूर्ण व धार्मिक भाषणांमुळे, तर फडणवीस यांना विकासाच्या मुद्यावर मागणी होती. फडणवीस यांनी ज्या पद्धतीने राज्यात विकास योजनांना गती दिली, सिंचन योजनांचा विस्तार केला व राज्यात केंद्राच्या योजनांना विक्रमी वेळेत मंजुरी दिली त्यावरून ते विकासाबाबत विजय रुपानी यांच्याही पुढे निघून जाताना दिसत आहेत. प्रत्येक ठिकाणी लोकांनी त्यांची भाषणे ऐकली व ते प्रभावित झाले. त्यांच्या प्रचाराचा आम्हाला लाभ होईल, अशी आशा आहे, असे शहा म्हणाले.