नवी दिल्ली - उत्तराखंडमध्ये दरीच जीप कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी चंपावत जिल्ह्यात हा अपघात झाला. या अपघातामध्ये जीपमध्ये असणाऱ्या नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका लहान मुलासह सहा पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, आज बुधवारी सकाळी साडेसहा वाजता राष्ट्रीय राज्यमार्गावर हा अपघात झाला आहे. चंपावत पासून 22 किमी दूर सवाला जवळ भाविकांची जीप दरीत कोसळली. ही मॅक्स जीप टनकपूरवरुन पिथॉरागढला निघाली होती. यामधील असणारे लोक पिथॉरागढचे होते. देवदर्शनावरुन ते घराकडे निघाले असल्याचे प्राथमिक वृत्त समोर आलं आहे. परिसरात एकच खळबळ उडाली असून दुख: व्यक्त केलं जात आहे.
या अपघाताची बातमी कळताच पोलिस आणि प्रशासनांच्या आधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात मृत्यू झालेल्यांना सध्या बाहेर काढण्याचे काम सुरु युद्धपातळीवर सुरु आहे. हा अपघात नेमका कशामुळं झाला हे अद्याप समजू शकले नाही. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी दुख: व्यक्त केलं आहे. त्यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश जारी केले आहेत.