ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 21 - महिला कर्मचा-यांसाठी एक दिलासादायक वृत्त आहे. केंद्र सरकारनं महिलांच्या सुरक्षेसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काम करणा-या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण झाले आणि त्यांनी त्याची तक्रार केल्यास त्यांना आता 90 दिवसांची भरपगारी सुट्टी मिळणार आहे. या नव्या सुधारणेनुसार कार्मिक आणि प्रशिक्षण विभागा(DOPT)नंही बदल केला आहे. ज्या महिलांनी लैंगिक शोषणाची तक्रार केली आहे, त्यांना तक्रार मागे घेण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत. असे प्रकार रोखण्यासाठीच केंद्र सरकारनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जोपर्यंत प्रकरणाची चौकशी सुरू राहील तोपर्यंत त्या पीडितेला भरपगारी रजा देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना ऑफिसमध्ये येण्याची गरज नाही. ऑफिसमध्ये जर एखाद्या महिलेबरोबर लैंगिक शोषण झाल्यास ती महिला प्रतिबंध, बंदी आणि प्रतिबंधक कायदा, 2013 अंतर्गत तक्रार दाखल करू शकते. यादरम्यान पीडितेला 90 दिवसांची भरपगारी रजा देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पीडितेला देण्यात आलेल्या सुट्ट्या तिच्या वैयक्तिक सुट्ट्यांमधून कापण्यात येणार नाहीत.
ऑफिसमध्ये लैंगिक शोषण झालेल्या महिलांना मिळणार 90 दिवसांची भरपगारी रजा
By admin | Published: March 21, 2017 2:03 PM