९० पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व, अहमदाबादमध्ये राहात होते अनेक वर्षे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 04:29 AM2018-06-23T04:29:26+5:302018-06-23T04:29:34+5:30
अनेक वर्षांपूर्वी भारतात स्थलांतरित झालेल्या ९० पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व बहाल केले आले आहे.
अहमदाबाद : अनेक वर्षांपूर्वी भारतात स्थलांतरित झालेल्या ९० पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व बहाल केले आले आहे. हे सर्वजण गुजरातच्या अहमदाबादमध्ये राहात होते. शुक्रवारी त्यांना नागरिकत्वाचे प्रमाणपत्र समारंभपूर्वक जिल्हाधिकारी विकास पांड्ये यांच्या हस्ते देण्यात आले.
जिल्हाधिकारी पांडे यांनी सांगितले की, हे ९० जण आता ते आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट व अन्य सुविधांसाठीही अर्ज करु शकतील. २०१६ सालापासून अहमदाबादमध्ये ३२० जणांना भारतीय नागरिकत्व बहाल केले आहे. त्यातील ९० टक्के लोक हे पाकिस्तानातील व उर्वरित बांगलादेशचे रहिवासी होते. नागरिकत्व मिळालेल्या भारतकुमार खटवानी म्हणाले की, पाकमधील मुस्लिमांसाठी तेथील हिंदूंसाठी हे सोपे लक्ष्य आहे. (वृत्तसंस्था)