नवी दिल्ली - केंद्र सरकारवरील अविश्वास ठरावाला पाठिंबा मिळवण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात बुधवारी चर्चा झाली. तेलगू देसमच्या अविश्वास ठरावाला आमचे खासदार पाठिंबा देतील, आश्वासन केजरीवाल यांनी दिले.आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यात आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले गेले होते, असे नायडू यांनी यावेळी त्यांना सांगितले. संसदेच्या दोन्ही सभागृहात माझ्या पक्षाचे सदस्य तेलगू देसम पक्षाला पाठिंबा देतील, असे आश्वासन केजरीवाल यांनी दिल्याचे टीडीपीचे राज्यसभेचे सदस्य सी. एम. रमेश यांनी सांगितले. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचे लोकसभेत चार तर राज्यसभेत तीन सदस्य आहेत.ठरावावर चर्चा नाहीअविश्वास ठरावाला ८० पेक्षा जास्त खासदारांचा पाठिंबा असल्याचा विरोधकांचा दावा असला तरी लोकसभेच्याअध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी अजून तो विचारात घेतलेला नाही.सभागृहाचे कामकाज सतत विस्कळीत होत असून घोषणाबाजीही होत असल्यामुळे प्रस्ताव विचारात घेतला नसल्याचे महाजन यांनी म्हटले आहे.
तेलगू देसमच्या अविश्वास ठरावाला ‘आप’चा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 1:37 AM