CoronaVaccine : "अदर पूनावाला, तुम्ही तर दरोडेखोरांपेक्षाही वाईट..."; भाजप आमदाराचा संताप, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 07:09 PM2021-04-22T19:09:29+5:302021-04-22T19:09:47+5:30
कोविशिल्ड लस तयार करणारी अदर पूनावाला यांची कंपनी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया, ही जगातील सर्वात मोठी लस निर्माता कंपनी आहे.
लखनौ - गोरखपूरचे भाजप आमदार राधा मोहन दास अग्रवाल यांनी कोरोनाविरोधातील लस कोवीशील्डच्या किंमतीवरून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ही लस तयार करणारी कंपनी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एसआयआय) सीईओ अदर पुनावाला यांची तुलना दरोडेखोरांशी करत, सरकारने महामारी अधिनियमांतर्गत ही कंपनी 'अधिग्रहित' करावी, असे राधा मोहन दास यांनी म्हटले आहे. कंपनीने खासगी रुग्णालये आणि राज्य सरकारांसाठी कोवीशील्ड लशीचा दर अपेक्षेपेक्षा अधिक ठरवल्याने अग्रवाल यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे. (Adar poonawalla worse than dacoit bjp mla radha mohan das agrawal slams vaccine pricing)
CoronaVirus : शरीरातील ऑक्सीजन स्तर कमी होऊ लागला, तर करा 'हा' उपाय; आरोग्य मंत्रालयानं दिलीय माहिती
अग्रवाल यांनी बुधवारी एक ट्विट करत म्हटले आहे, ''अदर पूनावाला तुम्ही तर दरोडेखोरांपेक्षाही वाईट आहात. पंतप्रधान कार्यालय, अमित शाह, बीएल संतोष, डॉ.हर्षवर्धन यांनी तुमच्या फॅक्टरीचे अॅपिडेमिक अॅक्ट अंतर्गत अधिग्रहण करायला हवे.'' अग्रवाल यांनी आणखी एका ट्विटमध्ये कृषी खर्च आणि किंमतीसंदर्भातील स्वामीनाथन आयोगाच्या फॉर्म्यूल्याचाही संदर्भात दिला आहे.
सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियानं केलीय अशी घोषणा -
अदर पूनावाला यांची कंपनी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस निर्माता कंपनी आहे. या कंपनीने बुधवारी खासगी रुग्णालयांना 600 रुपये प्रती डोस आणि राज्य सरकारांना 400 रुपये प्रती डोस दराने लस विकण्याची घोषणा केली आहे.
कोरोना काळात अचानक पैशांची गरज पडली तर! जाणून घ्या, कुठून होऊ शकते तत्काळ व्यवस्था?
'या' राज्यात तब्बल 3.48 लाख डोस वाया -
राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात लसीचे डोस वाया गेल्याची घटना घडली आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये हे प्रमाण सर्वाधिक असून आतापर्यंत राज्यात तब्बल कोरोना लसीचे 3.48 लाख डोस वाया गेले आहेत. सध्या देशात 45 वर्षांवरील लोकांचे लसीकरण सुरू आहे. मात्र 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसीला मोठ्या प्रमाणात मागणी असताना प्रशासनाचा निष्काळजीपणा पाहायला मिळाला आहे. या शिवाय तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशातही मोठ्या प्रमाणावर डोस वाया गेले आहेत.
"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"