नवी दिल्ली- स्त्री-पुरुष यांच्या विवाहबाह्य संबंधातील कायद्यासंदर्भात भारतीय दंड विधान(आयपीसी) कलम 497वर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. पती हा पत्नीचा मालक नाही, महिलेचा सन्मान करणं महत्त्वाचं असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं मांडलं आहे. भारतीय दंड विधान(आयपीसी) कलम 497 हा महिलांच्या सन्मानाविरोधात आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी हे कलमच रद्द केलं आहे. समाजात महिलांचं स्थान सर्वात वर आहे. महिला आणि पुरुषांना समाजात समान अधिकार आहे. व्यभिचार हे घटस्फोटाचं कारण ठरू शकते, परंतु तो गुन्हा नाही, असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
Verdict on Adultery: विवाहबाह्य संबंध आता गुन्हा नाही, कलम 497 रद्द; सुप्रीम कोर्टाचा क्रांतिकारी निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 11:01 AM